
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलचा नववीतील विद्यार्थी वीरेन विक्रम माने यांने ज्युडो क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बेळगाव येथे आयोजित २३व्या कर्नाटक राज्य मिनी व सब-ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत वीरेन माने याने ६० किलो वजनी गटात कांस्यपदक मिळविले आहे. या यशाबद्दल विद्यालयातर्फे वीरेन माने याचा सत्कार करून त्याचे अभिनंदन करण्यात आले. त्याच्या या यशासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक अजित एकसंबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वीरेनच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ यांच्यासह शिक्षकांनी कौतुक केले.

Belgaum Varta Belgaum Varta