Thursday , August 27 2026
Breaking News

सोशल मीडियावरील हनी ट्रॅपपासून सावध; पोलिसांचा नागरिकांना इशारा

Spread the love

 

अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन मैत्री महागात; फोटो-व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले

बेळगाव : सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढत चाललेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः हनी ट्रॅपच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढून त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असल्याने ऑनलाइन मैत्री करताना कमालीची सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून मैत्रीच्या विनंत्या, संदेश तसेच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधला जातो. सुरुवातीला मैत्रीपूर्ण संवाद साधून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर वैयक्तिक माहिती, छायाचित्रे किंवा व्हिडिओ शेअर करण्यास प्रवृत्त केले जाते. हीच माहिती नंतर गैरप्रकारासाठी वापरून संबंधित व्यक्तीला मानसिक दबावाखाली आणले जाते.

छायाचित्रे किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर सार्वजनिक करण्याची, नातेवाईक अथवा मित्रमंडळींमध्ये प्रसारित करण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या ऑनलाइन संपर्काला भुलून वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नयेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्यास विलंब न करता राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, तसेच संबंधित पुरावे जतन करून पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक अनोळखी संपर्क हा संभाव्य धोका मानून नागरिकांनी डिजिटल सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असा संदेश पोलिसांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

आमदार आसिफ सेठ यांनी स्वीकारला बुडा अध्यक्षपदाचा पदभार

Spread the love  कणबर्गी लेआउटच्या विकासासह आयटी पार्क उभारणीचा निर्धार बेळगाव : बेळगाव शहर विकास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *