Thursday , August 27 2026
Breaking News

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय हंदिगनूर, येथे 27 ऑगस्ट 2026 रोजी “समाजभूषण” लोकशाहीर, बहिर्जी शिरोळकर यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला.
महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुराडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर बहिर्जी शिरोळकर यांचे नातू श्री. दिनेश शिवाजीराव शिरोळकर, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य श्री. परशराम पाटील, श्री. लक्ष्मण कुदनुरकर, श्री. एम. के. पाटील, श्रीमती अनिता चौगुले, श्री. जोतिबा कोतेकर तसेच सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जी. एस. पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. मोहिते उपस्थित होते.
कै. बहिर्जी शिरोळकर यांच्या पुण्य स्मरणार्थ त्यांचे नातू श्री. दिनेशराव शिवाजीराव शिरोळकर यांच्या वतीने मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी वार्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनी कुमारी रसिका वरपे व कुमारी. ममता कांबळे यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजभूषण कै. बहिर्जी शिरोळकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला व आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुराडे यांनी अध्यक्ष समारोप करताना कै. बहिर्जी शिरोळकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती आर. एस. पाटील यांनी कै. बहिर्जी शिरोळकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस. व्ही. कांबळे यांनी केले.

 

About Belgaum Varta

Check Also

सोशल मीडियावरील हनी ट्रॅपपासून सावध; पोलिसांचा नागरिकांना इशारा

Spread the love  अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन मैत्री महागात; फोटो-व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *