Friday , August 28 2026
Breaking News

वीजेचा धक्का लागून कृष्णा नदीत पडलेला युवक बेपत्ता

Spread the love

 

बेळगाव : मोटारपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाला वीजेचा धक्का बसून तो कृष्णा नदीत पडल्याची घटना रायबाग तालुक्यातील खेमलापूर येथे गुरुवारी सकाळी घडली. या घटनेनंतर युवक बेपत्ता झाला असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

बसवराज ऐनापूर असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. खेमलापूर गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीकाठी तो सकाळी मोटारपंप सुरू करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक वीजेचा धक्का बसल्याने तो नदीत कोसळला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीत बेपत्ता झालेल्या बसवराजचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. ही घटना कुडची पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

न्यू गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणारा आणि डेक्कन हॉस्पिटलसमोरील अत्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *