Friday , August 28 2026
Breaking News

जय जनकल्याण सौहार्द सहकारी संस्थेची नववी वार्षिक सभा उत्साहात

Spread the love

 

 

सभासदांना २५ टक्के लाभांश जाहीर; ग्रामीण भागातील पहिली सौहार्द संस्था ठरल्याचा दावा

मण्णूर : जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर या संस्थेची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेच्या सभासदांना २५ टक्के लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली. ग्रामीण भागातील सौहार्द सहकारी संस्थांमध्ये २५ टक्के लाभांश देणारी ही पहिली संस्था असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

सभेच्या प्रारंभी संस्थापक तथा सहकाररत्न एल. के. कालकुंद्री सर, चेअरमन लक्ष्मण मंडोळकर आणि व्हा. चेअरमन संदीप कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संचालक मंडळाच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

संस्थापक एल. के. कालकुंद्री यांनी प्रास्ताविक केले, तर चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना कालकुंद्री यांनी सहकाराचे महत्त्व स्पष्ट केले. सहकारी संस्था ही कोणाच्या मालकीची नसून सभासद हेच संस्थेचे खरे मालक असतात. संचालक मंडळ संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करते, असे त्यांनी सांगितले.

विशेष सल्लागार चंद्रकांत कुलकर्णी तसेच संचालक सागर डोणकरी आणि संतोष केंचनावर यांनी संस्थेच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त केले.

संस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात २७ कोटी रुपयांची उलाढाल केली असून, १२ लाख २० हजार ९६७ रुपये १० पैसे निव्वळ नफा मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर सभासदांना २५ टक्के लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली.

ग्राहक, ठेवीदार, सभासद आणि कर्जदार यांना संस्थेकडून आपुलकीची वागणूक, विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आणि तत्पर सेवा दिली जात असल्याने नागरिकांनी संस्थेत मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. योग्य लाभार्थींना कर्जाचे वाटप करून संस्था अल्पावधीतच प्रगतीपथावर पोहोचल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि सामाजिक-शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मण्णूर, आंबेवाडी आणि गोजगा या तीन गावांतील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या १८ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

सभेला व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक ज्योतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, विशेष सल्लागार चंद्रकांत कुलकर्णी, नारायण शहापूरकर, सिद्राय बाळेकुंद्री, परशराम कदम, जयवंत मंडोळकर, ज्योतिबा चौगुले, मल्लाप्पा कोतेकर, कल्लाप्पा अष्टेकर, मारुती बामणे, नारायण कालकुंद्री, रामा चौगुले, दत्तू चौगुले, प्रमोद सांबरेकर, प्रवीण कालकुंद्री, शीतल चौगुले, लता कडोलकर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी पूनम डोंगरे, प्रतीक्षा चौगुले, सुनील सांबरेकर, मेघा बांदेकर, पिग्मी कलेक्टर यलाप्पा पाटील, प्रभाकर देसुरकर तसेच अ वर्ग सभासद उपस्थित होते.

नारायण शहापूरकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

रक्षाबंधन, श्रावणी शुक्रवारनिमित्त बेळगावच्या बाजारपेठेत खरेदीची लगबग

Spread the love  बेळगाव : श्रावणी शुक्रवार आणि रक्षाबंधन या सणांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *