Friday , August 28 2026
Breaking News

बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेचे साडेपाच लाखांचे दागिने लंपास

Spread the love

गर्दीचा फायदा घेत डाव साधला; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू

बेळगाव : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगेतील तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांची वर्दळ असलेल्या बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातच चोरीची ही घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन संबंधित महिला बसने प्रवास करण्यासाठी बसस्थानकात आली होती. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिच्यावर पाळत ठेवली असावी, असा संशय आहे. महिलेचे लक्ष विचलित होताच चोरट्यांनी बॅगवर डल्ला मारून दागिने लंपास केले. काही वेळानंतर महिलेने बॅग तपासली असता दागिने गायब असल्याचे तिच्या लक्षात आले.

या चोरीत सुमारे ५.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात तपास सुरू करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

चोरट्यांनी गर्दीचा नेमका कसा फायदा घेतला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून, संशयितांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलेवर पाळत ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करण्यात आली का, यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.

गर्दीत सावधान!

बसस्थानक, बाजारपेठ, रेल्वेस्थानक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी चोरटे सक्रिय असल्याने प्रवाशांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. दागिने, रोख रक्कम, मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तू उघडपणे न ठेवता त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वैजनाथ मंदिरात कुद्रेमानी काँग्रेस कमिटीचा श्रावण महाप्रसाद

Spread the love  कुद्रेमानी (प्रतिनिधी) : श्रावणमासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून कुद्रेमानी काँग्रेस कमिटीच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *