Sunday , September 20 2026
Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न

Spread the love

 

मुतगे : मुतगे (ता. बेळगाव) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.

शाळेच्या सभागृहात झालेल्या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील हे होते.

प्रारंभी मुलींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मराठी विषयाचे शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले. प्रभारी मुख्याध्यापिका एम. बी. लगाडे यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळा सुधारणा समितीचे ज्येष्ठ सदस्य शामराव पाटील यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले, तर सदस्य नारायणराव कणबरकर व शिरीष पाटील यांनी कुंडीतील रोपाला पाणी घालून या पालक मेळाव्याचे उद्घाटन केले.

याप्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक एम. वाय. केदार व नारायणराव कणबरकर यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक व पालकांची भूमिका याविषयी आपले विचार व्यक्त केले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा, शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. पालकांनीही आपल्या सूचना व अपेक्षा मांडत शाळेच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. वाय. पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला.

या मेळाव्याला पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. जाधव, शाळा सुधारणा समितीच्या सदस्या रेखा हंची, बी. व्ही. गुडगेनहट्टी यांच्यासह बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम कुराडे यांनी केले, तर एस. आर. पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *