Sunday , September 20 2026
Breaking News

देश, देव, धर्मासाठी प्रत्येकांनी काम करावे

Spread the love

 

 

अदृश काडसिद्धेश्वर स्वामी; समाधी मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात देशात अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मानवी जीवन संकटात सापडले आहे. त्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रत्येकाने देश, देव आणि धर्मासाठी काम केल्यास जीवन सुखकर होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने साधुसंतांच्या सहवासात राहून जीवन पद्धती समजून घ्यावी, असे आवाहन कणेरी मठातील अदृश काड सिद्धेश्वर स्वामींनी केले. येथील चिक्कोडी रोडवरील समाधी मठातील श्री विरूपाक्षलिंग स्वामींच्या जीवंत समाधीस २२५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त श्री विरूपाक्षलिंग (संगमदेव) स्वामींच्या १४ वा गुरू आराधना कार्यक्रम आणि श्री विरूपाक्षलिंग महास्वामींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पहाटे ६ वाजता जपयोग सकाळी ८ पालखी उत्सव व मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सकाळी १० वाजता श्रींचे प्रवचन व महाप्रसाद असे कार्यक्रम समाधी मठातील प्राणलिंग स्वामींच्या नेतृत्वाखाली पार पडले.
यावेळी विजापूर येथील ज्ञान योगा श्रमातील बसवलिंग स्वामी,
बिळ्ळूर येथील राजयोगी गुरुचन्नबसव स्वामी, माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, शंकरारूढ स्वामी- शिरोळ, डॉ. श्रद्धानंद स्वामी-सदलगा, शिवदेव स्वामी- टाकळी, योगनंद स्वामी- चडचण, महेशानंद स्वामी-हंचिनाळ, यतीश्वरानंद स्वामी-कागवाड, अभिनव बसवराजेंद्र स्वामी-बदामी, गिरीशानंद स्वामी- कनकनाळ, भिवानंद स्वामी- बसवनबागेवाडी, शिवशरणानंद स्वामी-चिकालगुंडी, सिद्धप्रसाद स्वामी-चिंचली, बसवमल्लिकार्जुन स्वामी-निपाणी, स्वयंप्रकाश स्वामी- संती, प्रभुलिंग स्वामी, डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, सुरेश शेट्टी, पुष्कर तारळे, रवींद्र शेट्टी, प्रवीण तारळे, सुनील पाटील, गीता पाटील यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *