Sunday , September 20 2026
Breaking News

आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत बेळगावचे खेळाडू चमकले

Spread the love

 

आशुतोष हिरेमठ, सोहम पाटील यांची यू-१९ कर्नाटक संभाव्य संघात निवड

बेळगाव : आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत दमदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या आशुतोष हिरेमठ आणि सोहम पाटील यांची यू-१९ कर्नाटक राज्याच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. दोन्ही खेळाडूंनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.

धारवाड विभागीय स्पर्धेत आशुतोष हिरेमठने सर्वाधिक धावा करत फलंदाजीत ठसा उमटवला, तर सोहम पाटीलने सर्वाधिक बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर बेळगाव स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावले.

बेंगळुरू येथे झालेल्या आंतरविभागीय स्पर्धेत सोहमने तब्बल १८ बळी घेतले. आशुतोषने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान मिळविले. मंगळूर विभागाविरुद्धच्या सामन्यात आशुतोषने ६१ धावा केल्या, तर सोहमने तीन बळी घेतले. बेंगळुरू सिटीविरुद्ध सोहमने आठ बळी घेत आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवून दिली.

शिमोगा विभागाविरुद्धच्या सामन्यात आशुतोषने ७५ धावांची शानदार खेळी केली. सोहमने चार बळी घेतल्याने धारवाड विभागाला विजय मिळवता आला. अंतिम सामन्यातही सोहमने चार बळी घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

आशुतोष आणि सोहम हे दोघेही बेंगळुरू येथे होणाऱ्या अंतिम निवड चाचणीसाठी रवाना झाले आहेत. त्यांना प्रशिक्षक बाळकृष्ण पाटील, विजय पाटील आणि सोमनाथ सोमनाचे यांचे मार्गदर्शन लाभले. क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, कार्यकारी अध्यक्ष दीपक पवार आणि सचिव प्रकाश मिरजी यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *