
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील करंबळ, कौंदल आणि रुमेवाडी गावांतील मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा उपक्रम तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. मराठी भाषा मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे असे युवा समितीचे सदस्य आणि एसडीएमसी अध्यक्ष संदेश कोडचवाडकर सांगितले. यावेळी एसडीएमसी कमिटी करंबळ आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.

त्यानंतर कौंदल या गावामध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहित्याचे वितरण करत, मराठी भाषा मराठी शाळा यांचं महत्त्व पटवून सांगितले. आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती नागेश भोसले आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता.
त्यानंतर रुमेवाडी शाळेला भेट देण्यात आली.
गेल्या नऊ वर्षांपासून युवा समितीच्या माध्यमातून सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्यात येतो. असे युवा कार्यकर्त्यांनि सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण उपस्थितीतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जोतिबा घाडी सह इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापुरचे श्री पाटील, शुभम कांबळे, आदित्य कांबळे, स्वराज पाटील, मुकेश गुरव, साईनाथ मळीक, कृष्णा खांबले, श्रीहरी पाटील, तुषार देसाई, श्रेयस हळ्याळकर, विठ्ठल पाटील आणि ओंकार पाटील इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta