Sunday , September 20 2026
Breaking News

पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी शक्य

Spread the love

 

लक्ष्मणराव चिंगळे; जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवड झाल्याने सत्कार

निपाणी (वार्ता) : पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर यापूर्वी दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. या पुढील काळात पक्ष संघटन व बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन जोमाने काम करणार आहे. शिवाय पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच संधी मिळेल, असा विश्वास चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे नुतन अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केला. चिंगळे यांची काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड केल्यानंतर चिंगळे हे शनिवारी (ता.१२) प्रथमच निपाणी दौऱ्यावर आले असता काँग्रेस कमिटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
निपाणी ब्लाॅक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनी स्वागत केले. प्रारंभी चिंगळे यांचा चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, राजेश कदम, बेडकिहाळ ब्लाॅक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
चिंगळे म्हणाले पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. हरिप्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या निर्णयानुसार मतदारसंघात अध्यक्षपद निवडीसाठी पक्ष निरीक्षक पाठवून ही प्रक्रिया पार पडली. देशात १ हजार ५६ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये ९०० जणांची निवड झाली आहे. उर्वरित पदाधिकाऱ्यांची लवकरच निवड होणार आहे. आपली अध्यक्षपदी निवड करताना चिक्कोडी जिल्हा निरीक्षक के. जयकुमार यांनी चिकोडी लोकसभा मतदारसंघातील जवळपास १८०० ते २ हजार जणांची मते जाणून घेतली. यासाठी के. जयकुमार यांनी प्रामाणिकपणे पक्ष निरीक्षक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील आजी-माजी मंत्री, खासदार यांच्याकडून अभिप्राय घेऊन अंतिम अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे पाठवला. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणूगोपाल यांच्याकडून प्रत्येक जिल्ह्यातील निरीक्षकांनी पाठवलेली यादी पडताळून चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपले नाव निश्चित झाले. यामध्ये पक्ष संघटनसाठी व पक्ष वाढीसाठी योग्य जिल्हाध्यक्षांची निवड पक्ष श्रेष्ठींसमोर त्यांनी ठेवली.आजतागायत आपण हे पद प्रामाणिक पणे पार पाडले.
नूतन पद निवडीसाठी आपल्याला मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार गणेश हुक्केरी, आमदार महेश तमन्नावर, आमदार राजू कागे, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार ए. बी. पाटील, माजी आमदार शाम घाटगे, मोहन शाह, महावीर मोहिते, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले.
यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, आर. के. धनगर, राहूल डोणे, महादेव कौलापुरे, अस्लम शिकलगार, सुनील गाडीवडर, दीपक सावंत, अरूण आवळेकर, विनोद बळ्ळारी, प्रवीण हेगडे, जीवन घस्ते, कासीमखान पठाण, राजेंद्र चव्हाण, अस्लम शिकलगार, किरण कोकरे, बबन चौगुले, देवेंद्र घस्ते, संदीप चावरेकर, किरण पाटोळे, दिपक सावंत, ॲड. संजय चव्हाण, बाळू कमते, वर्षा चव्हाण, फरीदा बुखारी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *