Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

एसटी समाजाच्या हक्काच्या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील निधीच्या कथित गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणावरून भाजप महिला मोर्चाच्या कर्नाटक सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी सरकारवर टीका केली आहे. “एसटी समाजाच्या हक्काच्या पैशांचा एक-एक रुपयाचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल,” अशी मागणी त्यांनी केली. महामंडळाच्या निधीतील सुमारे 89.62 कोटी रुपयांचा …

Read More »

नागपंचमी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी निपाणी नागोबा मंदिरात दिवसभर गर्दी

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात सोमवारी (ता.१७) नागपंचमी सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता.१६) नागोबा मंदिरात होमहवन व भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. सोमवारी (ता.१७) सकाळी नागोबा गल्लीतील नागरिक आणि श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर -सरकार यांनी कुंभार गल्ली येथे जाऊन चिखलापासून …

Read More »

वारुळाला जाऊया… नागोबाला पुजूया! भक्ती, श्रद्धा आणि परंपरेने रंगली नागपंचमी

  बेळगाव : श्रावणाच्या पवित्र महिन्याची सुरुवात होताच वातावरणात भक्तीचा सुगंध दरवळू लागतो आणि सण-उत्सवांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील श्रद्धेचे दर्शन घडते. याच मंगलमय वातावरणात ‘वारुळाला जाऊया… नागोबाला पुजूया!’ असा भक्तिभाव मनात घेऊन श्रावणातील पहिला सण असलेली नागपंचमी बेळगाव शहर व परिसरात अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. …

Read More »

मराठी शाळांना डावलाल तर गप्प बसणार नाही!

  शिक्षक भरतीत मराठी माध्यमासाठी जागांची मागणी; खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उद्या डीडीपीआय कार्यालयावर धडक आंदोलन बेळगाव : कर्नाटक शासनाच्या आगामी शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या शाळांसाठी आवश्यक जागांची तरतूद न करण्यात आल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मराठी शाळांना शिक्षकांपासून वंचित ठेवून त्यांचे अस्तित्वच धोक्यात …

Read More »

बेळगावच्या राजाचे ‘श्री गणेश खांब मुहूर्तमेढ पूजन’ उत्साहात संपन्न

  बेळगाव : सीमाभागातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या बेळगावच्या राजाच्या २०२६ सालच्या गणेशोत्सवाची अधिकृत तयारी सुरू झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली येथे ‘श्री गणेश खांब मुहूर्तमेढ पूजन’ पारंपरिक …

Read More »

उचवडे महात्मा फुले वाचनालयातर्फे एस. एस. निंगाणी यांचा सत्कार

  उचवडे : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बेळगावचे उप वनसंरक्षक (डीसीएफ) एस. एस. निंगाणी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन निंगाणी यांचा गौरव करण्यात आला. एस. एस. निंगाणी हे 42 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड

  बेळगाव : १७८ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी श्री. रघुनाथ बांडगी, उपाध्यक्षपदी प्रा. विनोद गायकवाड, मानद कार्यवाहपदी प्रसन्न हेरेकर, तर मानद सहकार्यवाहपदी श्री. शिवाजीराव हंगीरकर यांची निवड झाली. संस्थेचे मावळते अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या …

Read More »

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट रोजी 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून किल्ले प्रतापगड येथे सीमाप्रश्नी जागृती करण्यात आली. यावेळी तुळजाभवानी मंदिरात जाऊन पूजा,आरती व प्रार्थना करून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी साकडे घालण्यात आले. 15 ऑगस्ट हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेक पर्यटक …

Read More »

निपाणी शहरात वळूंची थरारक झुंज

  दुचाकींचे नुकसान ; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात वारंवार मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून येथील नगरपालिका परिसरात वर्दळीच्या ठिकाणी दोन मोकाट वळुंच्या झालेल्या झुंजीत रस्त्याकडेला लावून ठेवलेल्या अनेक दुचाकींचे नुकसान झाले. या जीवघेण्या लढतीमुळे बाजारपेठेत पळापळ झाली होती. मोकाट जनावरांच्या या वाढत्या त्रासामुळे निपाणीकर …

Read More »

अशोकधाम मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू

  लखीसराय : श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारी बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. श्रावण सोमवारनिमित्त भगवान शिवाला जलाभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती. याचदरम्यान मंदिर परिसरात वीजेची तार किंवा …

Read More »