Monday , August 17 2026
Breaking News

निपाणी शहरात वळूंची थरारक झुंज

Spread the love

 

दुचाकींचे नुकसान ; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात वारंवार मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून येथील नगरपालिका परिसरात वर्दळीच्या ठिकाणी दोन मोकाट वळुंच्या झालेल्या झुंजीत रस्त्याकडेला लावून ठेवलेल्या अनेक दुचाकींचे नुकसान झाले. या जीवघेण्या लढतीमुळे बाजारपेठेत पळापळ झाली होती. मोकाट जनावरांच्या या वाढत्या त्रासामुळे निपाणीकर त्रस्त झाले आहेत. या झुंजीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरात पालिकेजवळ दोन मोकाट वळु एकमेकांसमोर आले. त्यांच्यात सुरू झालेली झुंज इतकी भीषण होती की, दोन्ही वळू एकमेकांना धडका देत रस्त्यावरून धावत सुटले. त्यावेळी रस्त्याच्याकडेला पार्क केलेल्या तीन ते चार दुचाकींना वळूंनी जोरदार धडक दिल्याने दुचाकींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वळू अंगावर येण्यापूर्वीच पादचान्यांनी व व्यापाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने जीवितहानी टळली.
शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि बस स्थानक परिसर सध्या मोकाट जनावरांचे वास्तव्य आहे. हे वळू अनेकदा रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
——————————————————————-
‘मोकाट जनावराबाबत नगरपालिका प्रशासनाकडे बऱ्याचदा तक्रार करूनही पालिकेने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. शहरात मोकाट जनावरांचा हैदोस वाढला आहे. यापूर्वी अनेक नागरीकांवर हल्ले झाले आहेत. पालिकेने या मोकाट वळूंचा तात्काळ बंदोबस्त करावा. याशिवाय त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी.’
-जुबेर बागवान,
माजी सभापती, निपाणी नगरपालिका

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *