Monday , August 17 2026
Breaking News

उचवडे महात्मा फुले वाचनालयातर्फे एस. एस. निंगाणी यांचा सत्कार

Spread the love

 

उचवडे : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बेळगावचे उप वनसंरक्षक (डीसीएफ) एस. एस. निंगाणी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन निंगाणी यांचा गौरव करण्यात आला.

एस. एस. निंगाणी हे 42 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्यांनी जांबोटी आणि कणकुंबी परिसरात सेवा बजावताना उल्लेखनीय कार्य केले. आपल्या कर्तव्यनिष्ठ व कार्यक्षम सेवेमुळे त्यांनी या भागातील जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या या उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल महात्मा फुले वाचनालयाच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.

यावेळी युवा कार्यकर्ते विठ्ठल पाटील यांच्यासह वाचनालयाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

Spread the love  पथसंचलन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बेळगाव : देशभक्तीचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *