Monday , August 17 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड

Spread the love

 

बेळगाव : १७८ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी श्री. रघुनाथ बांडगी, उपाध्यक्षपदी प्रा. विनोद गायकवाड, मानद कार्यवाहपदी प्रसन्न हेरेकर, तर मानद सहकार्यवाहपदी श्री. शिवाजीराव हंगीरकर यांची निवड झाली.

संस्थेचे मावळते अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा ठराव कार्यकारी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री. अभय याळगी यांनी मांडला. त्यास श्री. अर्जुन गावडे यांनी अनुमोदन दिले.

निवडीनंतर संस्थेच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. नूतन अध्यक्ष श्री. रघुनाथ बांडगी यांनी मावळत्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल आभार मानले.

यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य अॅड. आय. जी. मुचंडी, श्री. अनंत लाड, सौ. सुनिता मोहिते, सौ. लता पाटील, श्री. विशाल राऊत, श्री. दशरथ सूर्यवंशी तसेच व्यवस्थापक श्री. विठ्ठल कडगांवकर उपस्थित होते.

१७८ वर्षांची परंपरा जपत सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याची जबाबदारी नूतन पदाधिकाऱ्यांवर आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विविध उपक्रमांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

Spread the love  पथसंचलन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बेळगाव : देशभक्तीचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *