Monday , August 17 2026
Breaking News

नागपंचमी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी निपाणी नागोबा मंदिरात दिवसभर गर्दी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात सोमवारी (ता.१७) नागपंचमी सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता.१६) नागोबा मंदिरात होमहवन व भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. सोमवारी (ता.१७) सकाळी नागोबा गल्लीतील नागरिक आणि श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर -सरकार यांनी कुंभार गल्ली येथे जाऊन चिखलापासून बनवलेल्या नागोबा मूर्तीसमोर आरती केली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढून मूर्ती नागोबा मंदिरामध्ये नेण्यात आली. श्रीमंत दादाराजे आणि श्रीमंत सम्राज्यलक्ष्मी निपाणकर दांपत्यांच्या हस्ते विधिपूर्वक पूजा करून प्राण प्रतिष्ठापणा करण्यात आली. भाविकांच्या उपस्थितीत आरती झाली. त्यानंतर लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
निपाणीसह परिसरातील नागरिकांनी नागोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी चिखलापासून बनवलेली नागोबाची मूर्तीचे सवाद्य मिरवणुकीने अंमलझरी तलावात विसर्जन करण्यात आली. यावेळी महेश खोत, मनोज शिंदे, सुनील मोरे, रमेश परीट, अमोल देवडकर, किरण शिंदे, पद्मावती पाटील, सुकुमार जाधव, संतोष चव्हाण, संजय परीट, मारुती जाधव, रमेश भोपळे, अभिजीत पाटील, आकाश रेडेकर, सुजित गायकवाड, निरंजन पाटील, सुरज पाटील, गजानन डवरी, अभिजीत पाटील यांच्यासह नागराज मंडळ, नागोबा देवस्थानचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू

Spread the love  निपाणी (वार्ता) : मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *