Monday , October 5 2026
Breaking News

खेळामुळे शरीर तंदुरुस्त बनू शकते; आमदार शशिकला जोल्ले

Spread the love

 

निपाणीत तालुका पातळीवरील क्रीडा, प्रज्ञाशोध स्पर्धेचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील मुले नेहमी व्यायाम करत असल्याने ते शारीरिक दृष्ट्या सदृढ बनत आहेत. याशिवाय शाळेतील विविध खेळामुळे शरीर तंदुरुस्त बनत आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून युवकांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्य जपावे. विद्यार्थ्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध स्पर्धा भरविण्यासह खेळाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. प्रत्येकाजवळ जय पराजय पचवण्याची ताकद असली पाहिजे. शारीरिक तंदुरुस्तीमुळे नेतृत्वगुणांना वाव मिळत असल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले.

बेळगाव जिल्हा पंचायत, निपाणी तालुका पंचायत, निपाणी, गट शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे गुरुवारी (ता. १) प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुला व मुलींच्या तालुका पातळीवरील क्रीडा व प्रज्ञाशोध स्पर्धेचे म्युनिसिपल हायस्कुल मैदानावर उद्घाटन करून आमदार जोल्ले बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभूलिंग स्वामी, उप तहसीलदार मृत्युंजय डंगी होते.
प्रारंभी आमदार जोल्ले यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण, दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन झाले. गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी स्वागत केले. त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यासह हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमास माजी सभापती राजू गुंदेशा, दैहीक शिक्षण पर्यवेक्षक एस. एस. पडलाळे, दत्ता जोत्रे, बंडा घोरपडे, सुनील शेवाळे, वाय. बी. हंडी, संपतकुमार कुरणे, भास्कर स्वामी, एफ.वाय. इनामदार, सुनील जनवाडे, अरविंद कांबळे, विभावरी खांडके, डॉ.एस.जे. पाटील सदाशिव तराळ यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक, सीआरसी, बीआरसी पदाधिकारी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव उरुसाच्या पार्श्वभूमीवर बाबाढंगवली दर्गा परिसराची उत्तम पाटील यांच्याकडून पाहणी

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *