Friday , October 23 2026
Breaking News

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अक्कोळ पार्श्वमती विद्यालयाचे यश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, संचलित अक्कोळ पार्श्वमती विद्यालयातील विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी वेदिका पाटील हिने ४०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय निवड निश्चित केली.
मयुरी पाटील हिने उंच उडीत प्रथम, ८० मीटर हर्डल्समध्ये प्रथम आणि १०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थिनींचा आश्रमाचे उपाध्यक्ष राजू पाटील, प्रशालेच्या उपाध्यक्षा अनिता पाटील, कार्यकारी संचालक महावीर पाटील, दादासाहेब मगदूम, सुंदर पाटील, अशोक व्हनशेट्टी, सन्मती रांगोळे, मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे यांच्या हस्ते सत्कार झाला. या यशासाठी क्रीडा शिक्षक यू. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *