Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

रेशन सर्व्हरच्या समस्येने दुकानदार, लाभार्थी त्रस्त; वितरण व्यवस्था ठप्प

  बेळगाव : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशन) सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने बेळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांसह लाभार्थीही त्रस्त झाले आहेत. एका लाभार्थ्याचा अंगठा घेऊन रेशन वितरणाचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी १५ ते २० मिनिटांपासून तब्बल एक तासापर्यंत वेळ लागत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. राज्यभर रेशन धान्याची उचल उशिराने झाल्याने …

Read More »

गणेशोत्सवापूर्वी येळ्ळूर येथील वीज वाहिन्यांची दुरुस्ती करा; येळ्ळूर म. ए. समितीचे हेस्कॉमला निवेदन

  झाडांच्या फांद्या तोडण्यासह वीज बिल कमी करण्याची ही मागणी बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर येथील शिवाजी रोडवरील विद्युत वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच विद्युत वाहिन्यांना धोकादायकरीत्या लागलेल्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हेस्कॉमकडे करण्यात आली. यासंदर्भात मंगळवारी (दि. २५) रोजी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात …

Read More »

ईद-ए-मिलादनिमित्त बेळगावात २४ तास दारूबंदी

  बेळगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात २४ तास दारूबंदी लागू करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांततेला गालबोट लागू नये, यासाठी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दारू विक्रीवर निर्बंध घालण्याचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार बुधवार, …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या; अधिकाऱ्यांना केल्या कार्यवाहीच्या सूचना

  बेळगाव : माजी मंत्री तथा बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी बेळगाव येथील आपल्या गृह कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या तक्रारींना प्रतिसाद दिला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक गृह कार्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक समस्यांबाबत अर्ज साद केले. लक्ष्मी …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूरच्या वतीने मराठी भाषेवर निखळ प्रेम करणाऱ्या यास्मिन शेख ताईना भावपूर्ण श्रद्धांजली

  खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर यांच्या वतीने आज मराठी भाषा आणि व्याकरणाच्या गाढ अभ्यासक, वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झालेल्या प्राध्यापिका यास्मिन शेख [पूर्वाश्रमी जेरूषा रूबेन] यांना अत्यंत आदराने ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय “मराठी भाषा मंचच्यावतीने” भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या विशेष शोकप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद …

Read More »

मूळ मालक असल्याचे भासवून शेती जमीन विकली; ६४ वर्षीय आरोपी अटकेत

  बेळगाव : मूळ जमीन मालक असल्याचे भासवून दुसऱ्याच्या नावावर असलेली शेती जमीन परस्पर विक्री करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून ६४ वर्षीय व्यक्तीला बेळगाव शहरातील मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख आनंद मोरे (६४), कलमेश्वर गल्ली, सोनारवाडी, खानापूर तालुका, बेळगाव जिल्हा अशी झाली आहे. याप्रकरणी उद्यमबाग, बेळगाव …

Read More »

अनैतिक संबंधाच्या संशयातून निर्घृण हत्या

  बेळगाव : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कळ्ळोळी गावात घडली. या घटनेत गुजनट्टी गावातील रमेश हणमंत बंट्रोळी यांचा मृत्यू झाला असून, कळ्ळोळी येथील बनप्पा रामचंद्र वडेर याच्यावर हत्येचा आरोप आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश बंट्रोळी आणि …

Read More »

भारत विकास परिषदेच्या समूहगीत स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूल सर्वप्रथम

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने रविवारी झालेल्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात ज्योती सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना आकर्षक चषक, रोख 5,000 रूपये व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्यांची पुढील महिन्यात सिंधनूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तर लोकगीत स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून डिव्हाईन प्रॉव्हिडेन्स स्कूलने …

Read More »

येळ्ळूर रस्त्यावरील कचरा तातडीने हटवा; समाज सारथी संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर रस्त्यावरील केएलई रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकून त्याचे वर्गीकरण केले जात असल्याने परिसरात दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या कचऱ्यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, कचरा टाकण्याचे व वर्गीकरणाचे काम तातडीने बंद करावे, अशी मागणी समाज सारथी संघटनेच्या …

Read More »

कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपीला फाशी द्या; केसरेकरांच्या अनाथ मुलांना शासकीय मदतीची मागणी

  बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, तसेच आई-वडिलांच्या निधनामुळे अनाथ झालेल्या दोन मुलांना शासकीय मदत व कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली. या मागणीसाठी शिष्टमंडळाने सोमवारी …

Read More »