बाजारात विविधरंगी राख्या दाखल ; यंदा दरवाढ नाही निपाणी (वार्ता) : आठवड्यापासून शहर आणि परिसरातील नागरिकांना राखी पौर्णिमेचे वेध निपाणी बाजारपेठेला लागले होते. गुरुवारी (ता.२७) हा सण साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारपेठेत थ्रीडी राख्यासह अयोध्येतील श्रीराम मंदिर, जय श्रीराम लिहिलेल्या राख्या लक्ष वेधत असून अनेकविध प्रकारच्या विविधरंगी, …
Read More »ऑक्टोबरपासून फ्लायओव्हरच्या कामाला मुहूर्त; वाहतूक कोंडीला मिळणार ‘ब्रेक’!
निविदा प्रक्रिया पूर्ण; काम सुरू करण्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी – प्रमुख मार्गांवरील कोंडी सुटण्याची अपेक्षा बेळगाव : बेळगाव शहराला भेडसावणाऱ्या दिवसेंदिवस वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी प्रस्तावित फ्लायओव्हरच्या कामाला अखेर ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. महत्त्वाकांक्षी फ्लायओव्हर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारीला …
Read More »श्री चांगळेश्वरी देवीचा श्रावण मासातील अभिषेक सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात
येळ्ळूर : श्रावण मासाच्या पवित्र पर्वानिमित्त येळ्ळूर ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा वार्षिक अभिषेक सोहळा मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय, मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. श्री चांगळेश्वरी अभिषेक मंडळ व श्री चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २४ वर्षांपासून ही धार्मिक परंपरा अखंडपणे जपली जात …
Read More »आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे नगरसेविका सारिका पाटील यांचा सत्कार
बेळगाव : नगरसेविका सौ. सारिका पाटील यांची बेळगांव महापालिकेच्या लेखा समितीच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आप्पाजी कुगजी हे तर शिवमंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद रेवणकर व उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी पाटील ह्या …
Read More »फटाक्यांच्या आवाजाने घाबरलेल्या मेंढ्या कालव्यात पडल्याने ८० मेंढ्यांचा मृत्यू
बेळगाव : श्रावण महिन्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मेंढपाळांनी एकत्र येत श्री. मेंढी लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते. मात्र, यात्रेदरम्यान फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने घाबरलेल्या मेंढ्या कालव्यात पडल्याने सुमारे ८० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील यादवाड गावात घडली. या दुर्घटनेत सुमारे २० लाख रुपये …
Read More »बिदर जिल्हा म. ए. समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक
बिदर : शासकीय व अशासकीय कार्यालयांवर मराठी भाषेतील फलक लावणे तसेच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी, बिदर यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यासंदर्भात बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिक बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आज, बुधवार (दि. २६ ऑगस्ट) रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती, बिदरचे अध्यक्ष रामराव …
Read More »डूडलीफाय घेऊन आले मुलांच्या कल्पकतेला रंग देणारी आनंदाची पर्वणी
मुलांच्या कृतीशीलतेला वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्ष कलाकृतीच्या माध्यमातून साकार व्हाव्यात, या उद्देशाने डूडलीफाय (Doodlify) मुलांसाठी आगळावेगळा कलात्मक अनुभव घेऊन आले आहे. विविध आकर्षक रेखाचित्रांना रंग आणि कल्पकतेची जोड देत मुलांच्या क्राफ्ट, पेंट आणि इमॅजिन या सर्जनशील प्रवृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न डूडलीफायच्या माध्यमातून …
Read More »बेळगाव केन्द्राला राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक
बेळगाव (प्रतिनिधी) : बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली मध्यवर्ती संघटना व मराठी प्रतिष्ठान बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगलोर येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात राष्ट्रीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभात बेळगाव केन्द्राला द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाने गौरवण्यात आले. बेंगलोर येथे रविवारी पार पडलेल्या बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजीव केसकर व श्री. …
Read More »BEACON जिल्हा सदस्यत्व सेमिनार बेळगाव येथे यशस्वीपणे संपन्न
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे “BEACON – जिल्हा सदस्यत्व सेमिनार २०२६–२७” चे आयोजन २३ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. एच. बी. राजशेखर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगाव येथे यशस्वीपणे करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० मधील सुमारे २४५ रोटेरियन्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रोटरी सदस्यत्व बळकट करणे, अधिक सक्षम …
Read More »शेळ्या चोरीच्या तीन घटनांचा उलगडा; दोघे अटकेत
बेळगाव : जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या शेळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी छडा लावत दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १.५० लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सात शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली कार आणि दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लक्ष्मण कणबर्गी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta