Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

एकच उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला सतीश जारकीहोळींचा पूर्णविराम

  ‘जनसेवेसाठी विशिष्ट पदाची गरज नाही’; विरोधकांकडून राजकीय फायद्यासाठी मुद्द्याचे भांडवल बंगळूर : राज्यातील एकच उपमुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेला सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पूर्णविराम दिला आहे. जनतेमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठीच एकच उपमुख्यमंत्री ठेवण्यात आला असून, आता या विषयावर चर्चा करणे निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट …

Read More »

सांस्कृतिक मूल्यांची संवर्धन करणे आवश्यक

  वृषाली हरिहर; कुर्लीत आंतरशालेय कथाकथन स्पर्धा निपाणी (वार्ता) : कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती व्यक्तीच्या विचारांना, भावनांना आणि कल्पनाशक्तीला योग्य दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी, सर्जनशील विचार विकसित करण्यासह सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी कला महत्वाची असल्याचे मत लंडन …

Read More »

निपाणी तालुका छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर संघटनेतर्फे ए.आय. बाबत एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील निपाणी तालुका छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर संघटनेतर्फे बुधवारी (ता.२६) ए.आय. बाबत एकदिवशीय शिबीर पार पडले. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील व्हिडिओ, छायाचित्रकार मार्गदर्शक दिगंबर कोळेकर उपस्थित होते. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन झाले. शिबिरात दिगंबर कोळेकर यांनी, छायाचित्र, व्हिडिओ, …

Read More »

पीकविमा नोंदणीला मुदतवाढ; संकटातील शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा

  पेरणीला विलंब झाल्याने राज्य सरकारची केंद्राकडे मागणी; लाखो शेतकऱ्यांना मिळणार विमा संरक्षणाची संधी बेळगाव : राज्यातील प्रतिकूल हवामान, पावसाची कमतरता आणि पेरणीला झालेला विलंब लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधान मंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीकविमा नोंदणीच्या मुदतीत वाढ केली आहे. राज्य सरकारने केलेल्या विनंतीची तातडीने दखल घेत केंद्रीय कृषी मंत्रालयाने …

Read More »

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने संत मीरा शाळेला क्रीडा साहित्य भेट

    बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम यांच्यावतीने संत मीरा इंग्रजी अनगोळ शाळेला क्रीडासाहित्य भेट देण्यात आले. संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष शशिधर पाटील, सचिव मल्लिकार्जुन मुरगुडे, उमेश रामगुरवाडी, प्रसाद …

Read More »

निपाणीतील चिमगांवकर गल्लीतील विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिमगांवकर गल्ली,बागवान गल्ली येथील विठ्ठल मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची दिंडी प्रदक्षिणा आणि महाप्रसाधने सांगता झाली. त्यानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महादेव केसरकर यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण, बाबुराव महाजन -महाराज यांच्या हस्ते वीणा पूजन …

Read More »

पुण्यातील लोकशिक्षक बाबा भारतीय शिक्षक पुरस्काराबद्दल निपाणीत डॉ. एन. डी. जत्राटकर यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे “पाली-मराठी” भाषेचे पहिले शब्दकोशकार लोकशिक्षक बाबा भारती यांच्या नावाने “लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार” देण्यात येतो. यावर्षीच्या २०२६ च्या २८ व्या पुरस्काराचे मानकरी सीमा भागातील परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. एन. डी. जत्राटकर यांना देण्यात आला. त्यानिमित्त निपाणी फाउंडेशनतर्फे …

Read More »

तुरमुरीत मटक्याचा डाव उधळला; बुकिला बेड्या

  तलावानजीक मटका नंबर घेण्याचा उद्योग; ग्रामीण पोलिसांचा छापा, रोकड व चिठ्ठ्या जप्त बेळगाव : तुरमुरी येथे तलावाच्या परिसरात खुलेआम मटका नंबर घेण्याचा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी धडक कारवाई करत मटका बुकिला अटक केली. मारुती चंद्रकांत मोटेकर (वय 38, रा. लक्ष्मी गल्ली, होनगा) असे अटक …

Read More »

स्तवनिधी डोंगराच्या पायथ्याशी म्हसोबा हटणीच्या युवकाचा दगडाने ठेचून खून

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्तवनिधी डोंगराच्या पायथ्याशी युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.२६) सकाळी उघडकीस आली. या घटनेने निपाणी परिसरात खळबळ उडाली आहे. महमंद समशेर खलिफ (वय ५२, रा. म्हसोबा हिटणी) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, स्तवनिधी डोंगराच्या पायथ्याशी …

Read More »

धर्मवीर संभाजीराजे चौकातील वाहतूक सिग्नल सुरू करण्यासाठी नगरपालिकेला निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बस स्थानक परिसरातील धर्मवीर संभाजीराजे चौकातील वाहतूक सिग्नल अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. तात्काळ नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी दखल घेऊन वेळेनुसार सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत यांच्यासह नागरिकांनी नगरपालिकेला दिले. निवेदनातील …

Read More »