Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय हंदिगनूर, येथे 27 ऑगस्ट 2026 रोजी “समाजभूषण” लोकशाहीर, बहिर्जी शिरोळकर यांचा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुराडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर बहिर्जी शिरोळकर यांचे नातू श्री. दिनेश शिवाजीराव शिरोळकर, शाळा सुधारणा …

Read More »

न्यू गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणारा आणि डेक्कन हॉस्पिटलसमोरील अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘न्यू गुड्स शेड रोड’ गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य गटारींचे बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी आज बेळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांना …

Read More »

ज्युडो स्पर्धेत स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलचा वीरेन माने याचे यश

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलचा नववीतील विद्यार्थी वीरेन विक्रम माने यांने ज्युडो क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बेळगाव येथे आयोजित २३व्या कर्नाटक राज्य मिनी व सब-ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत वीरेन माने याने ६० किलो वजनी …

Read More »

निपाणीत रविवारी बागवान परिवारातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : महागाव येथील संत गजानन महाराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, माजी सभापती जुबेर बागवान आणि माजी नगरसेविका जस्मिन बागवान यांच्या संयुक्त विद्यमाने चिराग गल्ली येथील उर्दू शाळेत रविवारी (ता.३०) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य …

Read More »

वैश्यवाणी महिला मंडळातर्फे कुंकुमार्चन संपन्न

  बेळगाव (प्रतिनिधी) : श्रावण मास निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे वैश्यवाणी महिला मंडळातर्फे समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी मंदिराच्या सभागृहात कुंकुमार्चन संपन्न झाले. वैश्यवाणी समाजाच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात कुंकुमार्चनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी समाजातील अनेक महिलांनी सहभाग दर्शविला होता. यावेळी या कुंकूमार्चनाचे यजमानपद सौ. अश्विनी कलघटगी यांनी भूषविले तर …

Read More »

एका पिआयडी क्रमांकावर एकच नळ जोडणीची अट रद्द करा; नागरिकांची मनपाकडे मागणी

  बेळगाव : एका पिआयडी क्रमांकावर केवळ एकच नळ जोडणी देण्याची जाचक अट तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांनी बेळगाव महानगरपालिकेकडे निवेदन सादर केले. या निवेदनातून शहरातील विविध पाणी समस्यांकडेही मनपाचे लक्ष वेधण्यात आले. एकाच घरात किंवा एकाच पिआयडी क्रमांकांतर्गत अनेक कुटुंबे स्वतंत्रपणे राहत …

Read More »

सोशल मीडियावरील हनी ट्रॅपपासून सावध; पोलिसांचा नागरिकांना इशारा

  अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन मैत्री महागात; फोटो-व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले बेळगाव : सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढत चाललेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः हनी ट्रॅपच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढून त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असल्याने ऑनलाइन मैत्री …

Read More »

मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा क्लबमध्ये सुळसुळाट!

  बेंगळूरमधील १० क्लबवर अन्नसुरक्षा विभागाची धडक कारवाई; अस्वच्छ स्वयंपाकघरे, धुरळ्याचा वावर उघड बेळगाव : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्नसुरक्षा व औषध नियंत्रण विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलनंतर आता क्लबकडेही विभागाने मोर्चा वळविला असून, ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील तब्बल …

Read More »

आमदार आसिफ सेठ यांनी स्वीकारला बुडा अध्यक्षपदाचा पदभार

  कणबर्गी लेआउटच्या विकासासह आयटी पार्क उभारणीचा निर्धार बेळगाव : बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) नूतन अध्यक्षपदी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. रखडलेल्या कणबर्गी वसाहत लेआउटच्या विकासासह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आसिफ सेठ …

Read More »

उद्योजकता आणि सामाजिक नेतृत्वाचा गौरव

  बेळगाव : २७ ऑगस्ट २०२६ रोजी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणला BNI Champions Chapter, Belgaum येथे जागतिक उद्योजक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. या विशेष प्रसंगी आमच्या अध्यक्षा आरटीएन डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच व्यवसाय क्षेत्रातील अनुभव आणि उद्योजकतेची भावना यावर आपले विचार …

Read More »