Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेचे साडेपाच लाखांचे दागिने लंपास

गर्दीचा फायदा घेत डाव साधला; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू बेळगाव : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगेतील तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांची वर्दळ असलेल्या बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातच चोरीची ही घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर …

Read More »

मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची शक्यता; लवकरच दोन नव्या मंत्र्यांची वर्णी

  बेंगळुरू : वाल्मीकी विकास महामंडळातील कथित गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर मंत्री बी. नागेंद्र यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्ली दौऱ्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली असून, येत्या एक-दोन दिवसांत नागेंद्र यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या …

Read More »

जय जनकल्याण सौहार्द सहकारी संस्थेची नववी वार्षिक सभा उत्साहात

    सभासदांना २५ टक्के लाभांश जाहीर; ग्रामीण भागातील पहिली सौहार्द संस्था ठरल्याचा दावा मण्णूर : जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर या संस्थेची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेच्या सभासदांना २५ टक्के लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली. ग्रामीण भागातील सौहार्द सहकारी संस्थांमध्ये २५ …

Read More »

वैजनाथ मंदिरात कुद्रेमानी काँग्रेस कमिटीचा श्रावण महाप्रसाद

  कुद्रेमानी (प्रतिनिधी) : श्रावणमासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून कुद्रेमानी काँग्रेस कमिटीच्या वतीने वैजनाथ मंदिर येथे गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा आणि गावातील बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमास २५० हून अधिक भाविक भक्तांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत महाप्रसादाचा भक्तिभावाने लाभ घेतला. …

Read More »

वीजेचा धक्का लागून कृष्णा नदीत पडलेला युवक बेपत्ता

  बेळगाव : मोटारपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाला वीजेचा धक्का बसून तो कृष्णा नदीत पडल्याची घटना रायबाग तालुक्यातील खेमलापूर येथे गुरुवारी सकाळी घडली. या घटनेनंतर युवक बेपत्ता झाला असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बसवराज ऐनापूर असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. खेमलापूर गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीकाठी तो सकाळी …

Read More »

केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाविरोधात खानापुरात विराट मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी

  खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील रहिवासी मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्या दुहेरी हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी खानापुरात विविध हिंदू संघटनांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो नागरिक, महिला आणि युवक मोर्चात सहभागी झाले. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा …

Read More »

राज्यातील १०१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित; बेळगाव जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही

  ८९ तालुक्यांत तीव्र दुष्काळ बंगळूर : राज्यातील १०१ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने घोषित केले असून, त्यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. यापैकी ८९ तालुक्यांत तीव्र, तर १२ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याची माहिती महसूलमंत्री तथा उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी गुरुवारी विधानसौध येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील कांही …

Read More »

बेळगावचे सीईओ राहुल शिंदे यांच्यावर सरकारकडून महत्त्वाची जबाबदारी

  बेळगाव : जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांच्यावर ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने महत्त्वाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे. कर्नाटक पंचायत राज आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘ई-स्वत्तू’ तांत्रिक कक्षाच्या कामकाजासाठी त्यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ई-स्वत्तू तांत्रिक कक्षातील प्रशासकीय तसेच तांत्रिक अडचणी दूर …

Read More »

रक्षाबंधन, श्रावणी शुक्रवारनिमित्त बेळगावच्या बाजारपेठेत खरेदीची लगबग

  बेळगाव : श्रावणी शुक्रवार आणि रक्षाबंधन या सणांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. रक्षाबंधनानिमित्त राख्या तसेच बहिणींसाठी विविध भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी वर्दळ पाहायला मिळाली. बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणून रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे. सणाच्या पूर्वसंध्येला गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, …

Read More »

नूतन मराठी विद्यालयामध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय व पुणे येथील क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने सायबर सुरक्षा बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देवचंद महाविद्यालयाचे वॉरियर्स पल्लवी पाटील व पल्लवी सतीश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डिजिटल युगात इंटरनेट, मोबाईल आणि ऑनलाइन …

Read More »