Friday , October 23 2026
Breaking News

चाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रातील मेंढ्यांचे कळप कर्नाटक सीमाभागकडे स्थलांतरित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : यंदा अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांना चरण्यासाठी चारा उपलब्ध होत नसल्याने मेंढपाळांसमोर संकट निर्माण झाले आहे. दुष्काळी भागातील पाण्याचे स्रोतही कोरडे पडू लागले आहेत. परिणामी तुटपुंज्या चाऱ्याच्या शोधात महाराष्ट्रातील मेंढपाळांची पावले कर्नाटक सीमाभागाकडे वळू लागली आहेत.
महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक सीमाभागात डोंगरकपारीत काही प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध आहे. पण पावसाने उघडीप दिल्याने चाऱ्याची पुरेशी वाढ झालेलीनाही. उपलब्ध असलेला चारा आता वाळू लागला आहे. तरीही दुष्काळी भागाच्या तुलनेत सीमा भागात चाऱ्याची उपलब्धता असल्याने महाराष्ट्र सीमाभागातील मेंढपाळ कर्नाटक सीमा भागात दाखल झाले आहेत. खरीप पिकांची काढणी सुरू असून रब्बी पिके आणि ऊस लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्याची लगबग शेतशिवारात सुरू आहे. पुढील पिकांच्या लागवडीपूर्वी शेतात शेळ्या-मेंढ्या बसवून नैसर्गिक खत मिळविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

About Belgaum Varta

Check Also

ममदापूरमध्ये विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन

Spread the love  निपाणी (वार्ता) : नवरात्र उत्सवाचा अखेरच्या दिवशी ममदापूर (के.एल.) विजया दशमी पारंपरिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *