


बेळगाव : भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेले बीडीसीसी बँकेचे संचालक आणि सौन्दत्ती भाजप मंडळाचे अध्यक्ष विरूपाक्ष मामनी यांच्यावर बंगळूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली.
विरूपाक्ष मामनी यांच्या प्रकृतीत देवाच्या कृपेने लक्षणीय सुधारणा होत असल्याचे विजयेंद्र यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत कोणालाही चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मामनी लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या मतदारसंघातील जनतेच्या सेवेत पुन्हा सक्रिय होतील, असा विश्वासही विजयेंद्र यांनी व्यक्त केला.
विरूपाक्ष मामनी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta