Friday , October 23 2026
Breaking News

मागण्या मान्य होईपर्यंत उस दराचा लढा सुरूच; रयत संघटनेच्या राजू पोवार यांचा इशारा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील उसाला प्रति टन ५ हजार ५०० रुपये दर मिळावा यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेसह महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. त्यानंतर रयत संघटनेने हत्तरगी ते हुबळी पदयात्रा काढून मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घराला घेराओ घालून हे आंदोलन सुरू केले आहे. प्रचंड ऊसाला ५ हजार ५०० रुपये दर दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे.
पदयात्रा काढून सुरू असलेल्या आंदोलनाला चार दिवस उलटले आहेत. कित्तूर येथे पद यात्रेचे रॅलीत रूपांतर झाले. यावेळी रयत संघटना राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, राज्याध्यक्ष चुन्नापा पुजारी, रयत संघटनेचे गौरव अध्यक्ष शशिकांत पडसलगी (गुरुजी), मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, लक्ष्मण सवदी यांनी आंदोलनाची दखल घेऊन आंदोलकांना मार्गदर्शन केले केले. मुख्यमंत्री शिवकुमार यांनी, रयत संघटनेच्या मागण्या योग्य आहेत. त्याची लवकर दखल घेऊन रयत संघटनेच्या व जिल्हा पालकमंत्री व सर्व कारखानदारांची बैठक घेऊन निर्णय मार्गी लावू असे सांगितले.
यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मण आणा सवदी, लक्ष्मी हेब्बाळकर, राजू शेठ, तिमन्ना, सत्याप्पा मल्हापुरे, कुमार मरडी, किसन नंदी, प्रकाश नाईक, वासू पंढरोळी, प्रेम चौगुले, मनोहर तेली, मंजू मंगसुळी, संजू हवनावर, मलाप्पा अंगडी, मंजू पुजारी, गोपाल कुन्नूर, अनिकेत जोमा, पुष्कर तारळे यांच्यासह विविध जिल्ह्यातील रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *