Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी अडथळे दूर करा

  पाणी, स्वच्छता, परवानगीची मानवाधिकार संघटनेची मागणी निपाणी (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरातील गणेशोत्सव मंडळांच्या समस्या तसेच श्री गणेश विसर्जनातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन २५ सप्टेंबर रोजी श्री विसर्जनाने संपणार असून, उत्सव …

Read More »

महात्मा बसवेश्वर क्रेडिट संस्थेच्या हारुगेरीतील कर्ज मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या हारुगेरी येथील कालिकादेवी भवनात आयोजित कर्ज कर्ज मेळाव्याला परिसरातले ग्राहकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. परमानंद वाडी येथील सद्गुरु डॉ. अभिनव ब्रह्मानंद स्वामी आणि मान्यवर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्य शाखेचे अध्यक्ष …

Read More »

ऑगस्टमध्ये पावसाचा ‘फ्लॉप शो’; जवाहर तलावाची पाणी पातळी स्थिर

  अवघा ६२ टक्के पाऊस निपाणी (वार्ता) : यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाची निपाणी परिसरात अवकृपा कायम असून ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात २५० मि. मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २२० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे महिनाभरातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत अवघा ६२ टक्केच पाऊस …

Read More »

हरतालिका, गणेश चतुर्थी एकाच दिवशी : तब्बल २६ वर्षांनंतर योग; पंचांगमधील माहिती

  निपाणी (वार्ता) : यंदा हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. १४ सप्टेंबर) आले आहेत. तब्बल २६ वर्षांनंतर असा योग जुळून आल्याची माहिती पौरोहित्यांनी दिली. यापूर्वी १९९६ आणि २००० मध्ये सुद्धा एकाच दिवशी हे दोन्ही सण आले होते. यावेळी हे सण एकाच दिवशी आल्याने आणि तिथीच्या …

Read More »

हजारांचा दंड भरण्याऐवजी हेल्मेट घ्या; निपाणी शहरात विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर पोलिसातर्फे हेल्मेट सक्ती केली आहे. पोलिस आयुक्तांच्या आवाहनानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनीथेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी चार दिवसात ४३ दुचाकीस्वारांवर १ हजार हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यापैकी २२ हजार रुपयांचा दंड जागीच वसूल केला. आता यापुढे दंड भरण्याऐवजी या पैशांत हेल्मेट खरेदी …

Read More »

अभ्यासासोबत आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रालाही महत्त्व द्यावे; आर. एम. चौगुले

  उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धांचा आंबेवाडी येथे उत्साहात शुभारंभ बेळगाव : विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष न देता सुदृढ आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्त्व द्यावे. खेळात जय-पराजय येत असतो; मात्र पराभवाने खचून न जाता त्यातून प्रेरणा घेऊन नव्या जोमाने पुढे जाणे हाच खऱ्या खेळाडूचा गुण आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि …

Read More »

पुण्यात महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाची बैठक संपन्न; बिदर-भालकीसह सीमाभागाच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा

  पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला पुन्हा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, पुणे विभागाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक काल सायंकाळी पुणे येथे पार पडली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती बिदर-भालकीचे अध्यक्ष श्री. दिनेश मुधाळे विशेष उपस्थित होते. बैठकीत खालील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली १. बिदर-भालकीची सद्यस्थिती : …

Read More »

बोरगावमधील विकासकामांना मंजुरी देण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील विविध प्रलंबित विकासकामांना मंजुरी देऊन ती तात्काळ मार्गी लावावीत, अशा मागणीचे निवेदन माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले. मंत्री सतीश जारकीहोळी बोरगाव येथे आले असता हावले यांनी त्यांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत …

Read More »

सीमाप्रश्नी लवकर सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

  बेळगाव : कर्नाटकसोबतच्या सीमाप्रश्नावर २००४ पासून प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी लवकर घ्यावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सीमाप्रश्नी लवकर सुनावणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. महाराष्ट्र सरकारच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अर्जात सीमाप्रश्नासंदर्भातील प्रलंबित खटल्याची सुनावणी तातडीने घेण्याची मागणी करण्यात …

Read More »

येळ्ळूर विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूलचे घवघवीत यश

  बेळगाव : येळ्ळूर येथे दि. २७ ऑगस्टपासून श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. १७ वर्षांखालील गटात सांघिक क्रीडा प्रकारात मुलांच्या संघाने थ्रोबॉलमध्ये, तर मुलींच्या संघाने खो-खोमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. वैयक्तिक स्पर्धांमध्ये …

Read More »