Friday , October 23 2026
Breaking News

मार्कंडेय नदीत अर्धवट कुजलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन

Spread the love

बेळगाव : काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्कंडेय नदीत अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी बेळगाव पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी काकती येथील मदन सिद्राई कडोलकर हे शेताकडे जात असताना त्यांना मार्कंडेय नदीत एका पुरुषाचा मृतदेह आढळला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार काकती पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद (यूडीआर क्रमांक ४३/२०२६) करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४(३)(iv) अंतर्गत तपास सुरू आहे.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून, उंची सुमारे ५ फूट ५ इंच आहे. त्याने निळ्या रंगाची पँट आणि चॉकलेटी रंगाची चड्डी परिधान केली होती. त्याच्या उजव्या हातावर ‘रॉकी’ असे नाव लिहिलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या वर्णनावरून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

माहिती असल्यास येथे संपर्क साधा : बेळगाव शहर पोलीस नियंत्रण कक्ष : ०८३१-२४०५२३३, काकती पोलीस निरीक्षक : ९४८०८०४११५, आपत्कालीन हेल्पलाइन : ११२

मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती किंवा ठोस सुगावा मिळाल्यास वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *