Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

निपाणीतील आरोग्य शिबिरास शहरासह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : महागाव येथील संत गजानन महाराज हॉस्पिटल व निपाणी ‌येथील माजी जनसेवक जुबेर बागवान, माजी जस्मिन जुबेर बागवान माजी नगरसेविका यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी घेण्यात आलेल्या मोफत उपचार शिबिरस शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात जनरल चेकअप औषधसह …

Read More »

‘जय गणेश श्री-२०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेची घोषणा

  विजेत्याला एसएसएस फौंडेशनकडून २५ हजारांचे पारितोषिक; चेतन ताशिलदार यांच्याकडून सायकल बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सची वार्षिक सभा क्लब रोड येथील डॉ. संजय अण्णा सुंठकर यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. या सभेत आगामी ‘जय गणेश श्री-२०२६’ या शरीरसौष्ठव स्पर्धेची घोषणा करण्यात आली. ‘जय गणेश श्री-२०२६’ किताब …

Read More »

दुसऱ्याच्या भूखंडाची परस्पर विक्री; ८० वर्षीय वृद्धेला अटक

  मालक असल्याचे भासवून उपनिबंधक कार्यालयात अंगठा ठसा अन् फोटो; साथीदार संशयित फरारी बेळगाव : दुसऱ्याच्या मालकीचा भूखंड आपलाच असल्याचे भासवून त्याची परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी ८० वर्षीय वृद्धेला अटक केली आहे. या फसवणूक प्रकरणात तिला मदत करणारा राहुल अनिल मगदूम (रा. काकती) हा संशयित फरारी असून, पोलिसांकडून …

Read More »

महागाईच्या भडक्यात जनता होरपळली; बेरोजगारीने तरुण हैराण!

  सीपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी बेळगाव : वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे खासगीकरण, कामगारांच्या हक्कांवरील गदा आणि सामाजिक भेदभावाच्या प्रश्नांवरून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)च्या बेळगाव शाखेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी सरकारचे लक्ष जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे वेधले. दिल्लीतील …

Read More »

बनावट कागदपत्रांनी जमिनींचे हस्तांतरण; ‘एसआयटी’ चौकशीची मागणी

    नानावाडीतील ७ एकर जमिनीच्या फेरफारावरून वकिल सचिन बिच्चू यांचे गंभीर आरोप; १९८४ च्या कथित मृत्युपत्राच्या नोंदीवरच प्रश्नचिन्ह बेळगाव : बनावट कागदपत्रे, खोटे शासकीय शिक्के, बनावट सह्या आणि तोतयागिरीच्या माध्यमातून मिळकतींचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्याचे प्रकार वाढत असून, अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी …

Read More »

खानापूरात ‘श्री विठ्ठल नाद’ भजन स्पर्धा उत्साहात

  विद्यार्थी, महिला व पुरुष गटातील भजनी मंडळांचा सहभाग; विजेत्यांचा गौरव खानापूर : लोकमान्य एज्युकेशन सोसायटी संचालित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय आणि श्री चौराशीदेवी संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री विठ्ठल नाद’ संगीत भजन स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थी, महिला आणि पुरुष अशा तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत …

Read More »

बालिका आदर्शला दुहेरी मुकुट; संत मीरा, सेंट झेवियर्स विजेते

    बेळगाव : कॅम्प येथील शाळेच्या मैदानावर कॅन्टोन्मेंट शाळेच्या वतीने आयोजित शहर व तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत बालिका आदर्श शाळेने दुहेरी मुकुट पटकावला. संत मीरा आणि सेंट झेवियर्स शाळांनीही आपापल्या गटात विजेतेपद मिळविले. प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने संत मीरा शाळेचा ३-१ असा …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत व विविध विभागांचे उद्घाटन संपन्न

  ​बेळगाव : “शिक्षणाने माणसाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडते. आई-वडील आणि गुरू हे आपल्या जीवनाला खरा आकार देतात, त्यामुळे नेहमी त्यांचा आदर केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि विचारांच्या माध्यमातून समाज घडवण्याचे महान कार्य केले, त्याच धर्तीवर आपण सर्वांनी समाज बदलण्याचा आणि प्रगतीकडे नेण्याचा …

Read More »

‘बेळगावचा राजा’ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्त श्री. भूषण बोरसे यांची भेट

  विविध विषयांवर सकारात्मक चर्चा बेळगाव : येत्या १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज, १ सप्टेंबर २०२६ रोजी ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे यांची पोलीस आयुक्तालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी आगमन सोहळा, गणेश चतुर्थी आणि गणेश विसर्जन मिरवणुकीच्या …

Read More »

पोलीस आयुक्तांची बदली सरकारचा निर्णय : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या बदलीवरून सुरू असलेल्या चर्चेला आता राजकीय रंग आला आहे. पोलीस आयुक्तांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याशी चर्चा करून माहिती घेणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, शहर पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारून अद्याप केवळ …

Read More »