Friday , October 23 2026
Breaking News

सातव्या दिवशीच्या दौडला म. ए. समिती महिला आघाडीतर्फे धारकऱ्यांना अल्पोपहार

Spread the love

 

 

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित सातव्या दिवशीची दौड शनिवारी धुवाधार पावसातही मोठ्या उत्साहात पार पडली. वरुणराजाच्या साक्षीने पार पडलेल्या या दौडमध्ये सहभागी झालेल्या हजारो धारकऱ्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीतर्फे अल्पोपहाराचे वितरण करून सेवा देण्यात आली.

दौडमध्ये सहभागी होणाऱ्या धारकऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. शनिवारी खुट येथील महिला आघाडीच्या हॉटेलमध्ये धारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दौडमध्ये सहभागी झालेल्या धारकऱ्यांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात महिला आघाडीच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या.

उपस्थितांचे आभार सुहास किल्लेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *