Friday , October 23 2026
Breaking News

बेळगावात हेरॉईन विक्रीचा प्रयत्न; दोघांना अटक

Spread the love

 

सीसीबी पोलिसांची कारवाई; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : बेळगाव शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीसीबी) पोलिसांनी हेरॉईन या अमली पदार्थाची बेकायदा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक केली. या कारवाईत २ लाख ९० हजार रुपये किमतीचे १४.४९ ग्रॅम हेरॉईन आणि १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजनाथ नायक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बेळगाव शहरालगत राष्ट्रीय महामार्गाजवळील जय किसान भाजी मार्केटच्या गेट क्रमांक १ परिसरात पोलिसांनी छापा टाकला.

यावेळी महांतेश रामण्णा अंबिगेर (वय ३७, सध्या रा. आंबेडकर गल्ली, अलारवाड, बेळगाव) आणि आकाश सुरेश नंदी (वय २८, रा. हरी कॉलनी, येरमाळ रोड, येळ्ळूर, बेळगाव) हे दोघे सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हेरॉईनची बेकायदा विक्री करण्याचा प्रयत्न करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४.४९ ग्रॅम हेरॉईन पावडरच्या १२४ पुड्या आणि दोन मोबाईल जप्त केले.

चौकशीत आरोपींनी महाराष्ट्रातील ‘अम्मा’ नावाच्या एका महिलेकडून हेरॉईन आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२९/२०२६ अन्वये अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) कलम ८(क) आणि २१(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी सीसीबीच्या पोलीस निरीक्षकांसह संबंधित पथकाचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *