


बेळगाव : शहरातील रेसकोर्स रोडवरील एका लोकप्रिय कॅफेत मध्यरात्री झालेल्या राडा प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी कारवाई करत दोन प्रमुख आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
१५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कॅफेमध्ये तरुणांच्या टोळक्याने गोंधळ घालत शांतताभंग केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एपीएमसी पोलिसांनी तपासाला गती देत दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संगमेश्वर नगर येथील अरमान मल्लिकाजान नदाफ आणि शाहू नगर येथील सामी शाकील तहसीलदार अशी आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta