Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

यशवंत गुरव – एक सच्चा समाजसेवक हरपला

  निस्पृह वृत्तीने समाजसेवा करणारे, जातिवंत शेतकरी कै. यशवंत रामलिंग गुरव (वय 86) यांचे दि. 22 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावच्या सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कै. गुरव यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी किणये (ता. बेळगाव) येथे गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या दहाव्या …

Read More »

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगावचा ‘माती ते मोरया’ उपक्रम उत्साहात

  बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगावच्या ‘विद्योदय’ उपक्रमांतर्गत अनगोळ येथील शासकीय मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. 34 येथे शनिवारी ‘माती ते मोरया’ या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व, शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे पर्यावरणीय …

Read More »

गणेशोत्सवापूर्वी बेळगावातील रस्ते खड्डेमुक्त करा

  लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाची मनपा आयुक्तांकडे मागणी बेळगाव : गणेशोत्सवाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना बेळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गणेशमूर्तींचे आगमन, मिरवणुका तसेच विसर्जनाच्या मार्गांवर नागरिक, भाविक आणि गणेशोत्सव मंडळांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती …

Read More »

डीजेमुक्त गणेशोत्सव अन् ‘एक गाव एक गणपती’वर भर

  जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांचा संकल्प; मंडळ पोलीस निरीक्षक तळवार यांची माहिती निपाणी (वार्ता) : यंदाचा गणेशोत्सव गतवर्षीप्रमाणेच डीजेमुक्त व्हावा, यासाठी जिल्हा पोलिस पोलीस प्रमुख, चिक्कोडी जिल्हा पोलीस उपाधीक्षकांनी शांतता कमिटीच्या बैठका बोलावल्या आहेत. यावेळी डॉल्बी, डी.जे. वाले, गणेश मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. तत्पूर्वी, शहरा आणि ग्रामीणमधील पोलिस ठाण्याच्या …

Read More »

दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला ५० रोपे लावण्याची शिक्षा

चिकोडी : दारूच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी चिकोडी जेएमएफसी न्यायालयाने आरोपीला अनोखी शिक्षा सुनावली आहे. यक्षंबा शहरातील अनिल निंगाप्पा पुजारी याने स्वतःहून आपली चूक मान्य केल्याने न्यायालयाने त्याला ५० रोपे लावण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार चिकोडी न्यायालयाच्या आवारात २५ तर सदलगा पोलीस ठाण्याच्या आवारात २५ अशी एकूण ५० रोपे लावण्याचे निर्देश …

Read More »

जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, ही समाजाची अनेक वर्षांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे जैन समाजाचे भट्टारक स्वामीजी आणि प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन या बाबत निवेदन देऊन चर्चा केली. या प्रसंगी राष्ट्रसंत आचार्य श्री १०८ गुणधरनंदी महाराज …

Read More »

आडी मल्लिकार्जुन डोंगरावर शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; शिवलिंगाच्या पूजेससह हर हर महादेवाचा गजर

    निपाणी (वार्ता) : आडी (तालुका निपाणी) येथील संजीवनगिरी वरीलश्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भरत असते. आज श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हजारो भाविकांनी श्री मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांच्या अलोट गर्दीत, हर हर महादेवाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात श्रावण तिसऱ्या सोमवारची यात्रा पार …

Read More »

बोरगाव-घोसरवाड सीमाभागातील दूधगंगा नदीवर नवीन बंधारासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव-घोसरवाड सीमाभागातील दूधगंगा नदीवर असलेले जुने धरण नादुरुस्त झाल्याने त्याचा फटका बोरगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना बसत आहे. पावसाळ्यासह उन्हाळ्यात काळम्मावाडी धरणातून नदीला सोडण्यात येणारे पाणी बोरगाव परिसरात पुरेशा प्रमाणात साठून न राहता महाराष्ट्रातील घोसरवाडच्या दिशेने वाहून जाते. परिणामी काही दिवसांतच नदीपात्र कोरडे पडून शेतीसह बोरगाव …

Read More »

तळागाळातील समाजसेवेसाठी सेवाभावी संस्थांची भूमिका महत्त्वाची : ॲडमिरल रघुवीर पुरंदरे

  अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व अधिकारग्रहण सोहळा उत्साहात बेळगाव : देश विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि विविध क्षेत्रांत झपाट्याने प्रगती करत असला, तरी विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सेवाभावी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाजातील गरजू, निराधार, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा ओळखून …

Read More »

कारंजीमठ येथे सर्वसामान्यांसाठी दुसऱ्या शववाहिकेचे लोकार्पण; रमाकांत आणि चंद्रकांत कोंडुस्कर यांचा सामाजिक उपक्रम

  बेळगाव : शिवबसव नगर येथील कारंजीमठ, जोतीबा मंदिर परिसर येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सामाजिक बांधिलकीतून जनतेच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या दुसऱ्या शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या सहकार्याने विविध सामाजिक कार्य करण्यात येतात, त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ही सेवा सुरू करण्यात …

Read More »