Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

मार्कंडेय नदीकाठाला कचऱ्याचा विळखा; धार्मिकतेच्या नावाखाली पर्यावरणाची हेळसांड

    कंग्राळी खुर्द हद्दीत पूजेचे साहित्य, प्लास्टिक व ओला-सुका कचरा नदीत; कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी बेळगाव : धार्मिक श्रद्धा जपत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही नागरिकांनी ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे. कंग्राळी खुर्द गावाच्या हद्दीत मार्कंडेय नदीकाठासह नदीवरील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, पूजेचे साहित्य, फळे-फुले, नैवेद्य, प्लास्टिकच्या पिशव्या …

Read More »

नवनियुक्त पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचे मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाकडून स्वागत

  बेळगाव : बेळगाव शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या पहिल्याच दिवशी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने त्यांचे बेळगाव नगरीत अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन स्वागत महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. रमाकांत (दादा) कोंडुसकर यांनी नवीन …

Read More »

प्रकाश निकम यांनी स्वीकारला पोलीस आयुक्त पदाचा पदभार

  बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदाच्या बदलीवरून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तालयात आगमन होताच त्यांचे मानाच्या सलामीने स्वागत करण्यात आले. यानंतर प्रकाश निकम यांनी बेळगाव शहराचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. धारवाड येथे बदली …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर; ६६७ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी मराठी व्याकरण, मराठी हस्ताक्षर व मराठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये तब्बल ६६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. निबंध स्पर्धा – …

Read More »

काँग्रेसच्या गॅरंटी योजनांतून खानापूर तालुक्याला ३ वर्षांत सुमारे ५५० कोटींचा थेट लाभ : डॉ. अंजली निंबाळकर

  खानापूर : काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार राज्यभर लागू केलेल्या पंचहमी गॅरंटी योजनांचा गरीब, महिला, सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाला मोठा लाभ होत असून, खानापूर तालुक्यात गेल्या तीन वर्षांत या योजनांमुळे सुमारे ५५० कोटी रुपयांचा थेट आर्थिक लाभ जनतेला मिळाला आहे, असा दावा माजी आमदार तथा …

Read More »

पहिले वेतन आणि सामाजिक भान: क्रीडा प्रशिक्षक प्रा. कपिल गुरव यांचा प्रेरणादायी आदर्श उपक्रम!

  खानापूर : आयुष्यात प्रत्येकासाठीच पहिली कमाई किंवा पहिला पगार हा अतीव आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो. या पहिल्या पगाराचा उपयोग बऱ्याचदा स्वतःच्या हौसमौजेसाठी किंवा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी केला जातो. परंतु, या सर्वसाधारण प्रवाहाच्या पलीकडे जाऊन खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य डिग्री महाविद्यालय खानापूरचे प्राध्यापक श्री. कपिल गुरव …

Read More »

प्रकाश निकम आज स्वीकारणार पोलीस आयुक्त पदाची सूत्रे

  भूषण बोरसे आज सोपवणार पदभार बेळगाव : गणेशोत्सवामुळे लांबलेली बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदाच्या पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया अखेर गुरुवारी पूर्ण होणार आहे. २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश अमृत निकम आज बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार असून, मावळते आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे त्यांच्याकडे पदभार सोपवणार आहेत. राज्य सरकारने २९ ऑगस्ट …

Read More »

दि विनर्स सौहार्द सहकारी संघाच्या बेळगाव शाखेचे उद्घाटन

बेळगाव : दि विनर्स सौहार्द सहकारी संघ नियमित, जांबोटी या संस्थेच्या बेळगाव शाखेचे उद्घाटन २ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन सुरेश शंकर गंभीर आणि त्यांच्या पत्नी सौ. संगीता गंभीर यांच्या हस्ते फीत कापून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. दि विनर्स सौहार्द सहकारी संघाने गेल्या तीन …

Read More »

उत्तर विभागीय कर्तव्यकूट-२०२६मध्ये बेळगाव शहर पोलिसांचा झेंडा; सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांकाचा बहुमान!

  बेळगाव : उत्तर विभागीय स्तरावरील आठव्या कर्तव्यकूट-२०२६ स्पर्धेत बेळगाव शहर पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १३ पुरस्कारांची कमाई केली असून, विभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांक पटकावून शहर पोलीस आयुक्तालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या आठव्या बेळगाव उत्तर विभागीय स्तरावरील कर्तव्यकूट-२०२६मध्ये बेळगाव शहर …

Read More »

सरस्वतीनगरच्या प्रवेशद्वाराची दुरवस्था; नागरिकांना सांडपाण्यातूनच करावी लागते ये-जा

    बेळगाव : सरस्वतीनगरच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरून सतत वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, दुर्गंधीचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या सांडपाण्यातूनच वाट काढत ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी …

Read More »