बाळासाहेब जासूद : निपाणीत दुर्गामाता दौडीची सांगता निपाणी (वार्ता) : युवकांमध्ये समाज आणि देश बदलण्याची ताकद आहे. पण अलीकडचा तरुण दिशाहीन बनल्याने त्यांना मार्गदर्शनची गरज आहे. त्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरच सध्याची पिढी योग्य पद्धतीने काम करू शकेल. समाज, देश आणि धर्मासाठी युवा मंडळींनी पुढे येण्याचे …
Read More »बेळगाव उपनोंदणी कार्यालयाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्थलांतर
जुन्या जागेवर उभारणार पाच मजली प्रशासकीय संकुल; सोमवारपासून नव्या ठिकाणी कामकाज सुरू बेळगाव : मालमत्तेची खरेदी-विक्री आणि अन्य नोंदणीसंबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नव्या ठिकाणी सेवा उपलब्ध होणार आहेत. बेळगाव येथील उपनोंदणी कार्यालयाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्थलांतर करण्यात आले असून, सोमवार, १९ ऑक्टोबरपासून नव्या ठिकाणी कामकाजाला …
Read More »कपिलेश्वर तलावात दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी; उत्साहात नवरात्रोत्सवाची सांगता बेळगाव : शहर आणि परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन विजयादशमीपासून सुरू झाले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईच्या उत्साही सहभागात दुर्गामातेला निरोप देण्यात आला. नवीन कपिलेश्वर तलाव आणि रामेश्वर तीर्थ अर्थात जकिनहोंडा तलाव येथे …
Read More »१ नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळणार : शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार; गल्लीगल्लीत बैठका घेऊन जनजागृती करणार
बेळगाव : आगामी १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. शहरातील गल्लीगल्लीत बैठका घेऊन जनजागृती करण्यासह आंदोलनात मराठी भाषिकांचा व्यापक सहभाग मिळविण्याची रणनीती समितीने आखली आहे. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मराठी …
Read More »पावसाच्या दडीने बेळगाववर जलसंकटाचे सावट!
दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा; टँकरद्वारे तहान भागविण्याचा प्रयत्न बेळगाव : पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने बेळगाव शहरावर आतापासूनच जलसंकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असून, दहा ते बारा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत …
Read More »चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीला अटक
बेळगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव शहरातील हनुमाननगर येथे घडली आहे. अश्विनी हेगडे असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती विठ्ठल हेगडे याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लिगवाड येथील …
Read More »प्रभुनगर पुलाजवळ दुचाकी घसरून अपघात; ३७ वर्षीय स्वाराचा मृत्यू
खानापूर : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील प्रभुनगर पुलाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नारायण परशुराम कुंडेकर (वय ३७, रा. महादेव गल्ली, राजहंसगड, ता. जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (ता. २० ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण कुंडेकर हे होंडा …
Read More »निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी
आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : निपाणी येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार राजवाड्यामध्ये ऐतिहासिक व पारंपारिक पद्धतीने दसरोत्सव पार पडला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी अमराईतील रेणुका मंदिराजवळ सोने लुटून दसरा साजरा करण्यात आला. मंगळवारी (ता.२०) सकाळी तुळजाभवानीला अभिषेक घालून घट …
Read More »‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..’ : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या ग्रंथालयाचा शुभारंभ
बेळगाव : युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने आणि ‘राज्य मराठी विकास संस्था, मुंबई’ यांच्या सहकार्याने युवा समितीच्या टिळकवाडी येथील कार्यालयात ग्रंथालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व विविध ज्ञानग्रंथांचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित बालचमू तसेच …
Read More »समितीच्या नगरसेवकांची निष्ठा कुणाशी? मराठी जनतेत संभ्रम
बेळगाव : बेळगावच्या सीमाप्रश्नाबाबत महाजन अहवाल अंतिम असून बेळगाववर कर्नाटकाचा हक्क असल्याचा ठराव अलीकडेच बेळगाव महानगरपालिकेत संमत झाला. या ठरावाला मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून आलेल्या राष्ट्रीय पक्षांतील काही नगरसेवकांनी पाठिंबा दिला, तर काहींनी मौन बाळगून अप्रत्यक्ष सहमती दर्शविल्याची भावना सीमाभागातील मराठी जनतेत निर्माण झाली. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta