


खानापूर : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील प्रभुनगर पुलाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नारायण परशुराम कुंडेकर (वय ३७, रा. महादेव गल्ली, राजहंसगड, ता. जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (ता. २० ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण कुंडेकर हे होंडा शाईन मोटारसायकलवरून (क्र. केए-२२/ईक्यू-७७६८) गणेबैल येथून बेळगावच्या दिशेने जात होते. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ ए वरील प्रभुनगर परिसरात ते सर्व्हिस रस्त्यावरून प्रवास करीत असताना पुलाजवळ त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरून अपघात झाला.
या दुर्घटनेत कुंडेकर यांच्या डोक्याला, हाताला तसेच पोटाच्या भागाला गंभीर दुखापत झाली. या गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे राजहंसगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta