Friday , October 23 2026
Breaking News

निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी

Spread the love

 

आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार राजवाड्यामध्ये ऐतिहासिक व पारंपारिक पद्धतीने दसरोत्सव पार पडला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी अमराईतील रेणुका मंदिराजवळ सोने लुटून दसरा साजरा करण्यात आला.
मंगळवारी (ता.२०) सकाळी तुळजाभवानीला अभिषेक घालून घट हलविण्यात आला. श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर यांनी मानाच्या पाच घरात जोगवा मागितला. मांग वाड्यातून आणलेला जोगवा शिजवण्यात आला. त्यानंतर शस्त्रपूजन झाले. मानकरी शिवाजी भोई, गजानन भोई, पांडुरंग भोई, शिवम भोई व मानकरी पालखी घेऊन कुंडावर पूजा केली.

श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते रेणुका मातेचा लिंब नेसविण्यात आला. त्यानंतर मानाची महादेवाची पालखी सासणे गल्लीतून सवाद्य मिरवणुकीने सासनकाठीसह निपाणकर राजवाड्यात आली. राजवाड्यातून श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांची पालखी लव्याजम्यासह रेणुका मंदिराजवळ सिमोलंघनासाठी रवाना झाली.
सायंकाळी श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणकर त्यांनी शहराबाहेरील वेशीवर जाऊन जाऊन आपट्याच्या पानांची पूजा केली. यावेळेस निपाणकर घराण्याचे युवराज श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर, श्रीमंत धनदीपराजे निपाणकर, श्रीमंत शिवतेजराजे निपाणकर, सुधाकर भोईटे, गजेंद्र तारळे, संजय पारळे, युवराज पाटील, अजित खराडे, सुजित गायकवाड यांच्यासह मानकरी उपस्थित होते. पूजेनंर रेणुका मंदिर येथे मानाच्या दोन्ही पालख्या व शासनकाठी रेणुका मंदिराजवळील कट्ट्यावर सिमोल्लंघन सोहळा पार पडला.
नंतर दरबारात सोने वाटप झाले. रात्री दरबार बरखास्त करून देवीचा व जोतिबाचा चौक मांडून श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते पूजा झाली.
ममदापूरचे गोंधळी श्रीकांत पुजारी, प्रसाद पुजारी, स्वरूप पुजारी, सदा डवरी, किसन डवरी, जोतिबा डवरी यांनी मशाल पेटवून गोंधळ मांडला.

About Belgaum Varta

Check Also

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ‘एसआयआर’ प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, शिवाय चुकीच्या पद्धतीने वगळण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *