Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस सतर्क; राऊडीशीटर परेड घेऊन पोलीस आयुक्तांचा कडक इशारा

    बेळगाव : शहरात होणाऱ्या भव्य गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सक्रिय राऊडीशीटरची परेड घेण्यात आली. नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी राऊडीशीटरना कडक शब्दांत इशारा देत गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा …

Read More »

बेळगाव प्रायमरी टीचर्स सोसायटीची १०३ वी वार्षिक सभा उत्साहात

    गुणवंत विद्यार्थी, संचालक व निवृत्त शिक्षकांचा सत्कार; सभासदांना लाभांशाचे वाटप बेळगाव : बेळगाव प्रायमरी टीचर्स सोसायटीची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा क्रमांक पाचमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोसायटीचे अध्यक्ष अरुण एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक सुनील देसुरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर …

Read More »

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक; आठ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

    त्रिशूर : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने आठ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात शुक्रवारी उशिरा रात्री हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर कैपमंगलमजवळील पनंबिक्कुन्नू येथे हा अपघात घडला. मृत झालेले सर्व विद्यार्थी तामिळनाडूतील असल्याची …

Read More »

हुतात्मा चौक गणेशोत्सव मुहुर्तमेढ व अहवालाचे प्रकाशन संपन्न

  बेळगाव : येथील हुतात्मा चौक गणेश मंडळातील उसत्वाची मुहुर्तमेढ अध्यक्ष श्री. अशोक पोतदार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून नुकतीच पार पडली. प्रारंभी मंडळाचे प्रेरणास्थान असलेले कै. रामकुमार जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.व अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री. पोतदार यांनी सालाबादप्रमाणे यंदाचा उत्सव देखील सर्वांच्या सहभागाने शिस्तबद्द, धार्मिक वतावरण्यात …

Read More »

मराठी विद्यानिकेतन येथे बालवाडी विभागात ‘अंकुर’ वर्गाची पालक कार्यशाळा उत्साहात संपन्न

  बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन, बालवाडी विभागामध्ये ‘अंकुर’ वर्गाची पालक कार्यशाळा दिनांक ४ सप्टेंबर रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. बालशिक्षण तज्ज्ञ मारिया मॉन्टेसरी यांचा जन्मदिन आणि ताराबाई मोडक यांचा स्मृतिदिन याचे औचित्य साधून या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेची सुरुवात ‘आम्ही प्रकाश बीजे’ या प्रार्थनेने झाली. …

Read More »

विद्यार्थी रूपी रथाचे सारथी; शिक्षकांनीच उचलली शाळेची वाट

  विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांची रिक्षा वर्दी; महिन्याला दहा हजारांचा खर्च स्वतःच्या खिशातून – राधिका सांबरेकर यांजकडून  ‘गुरुविना कोण दाखवील वाट?’ असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो त्यांच्या स्वप्नांचा मार्गदर्शक, पालक आणि आधारवडही असतो. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम जसे कुंभार …

Read More »

दुर्गम धनगरवाड्याच्या ज्ञानज्योतीचा अखंड दीप

  १५ वर्षांपासून प्रतिकूल परिस्थितीत बाबुराव सावंत सरांची ज्ञानसेवा; ग्रामस्थांच्या विश्वासावर शाळेची वाटचाल – राधिका सांबरेकर यांजकडून  बेळगाव : शहरापासून काही अंतरावर शिक्षणाच्या विविध सुविधा सहज उपलब्ध असताना, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आजही शाळेपर्यंत पोहोचणे आणि शिक्षणाची दारे खुली ठेवणे हे मोठे आव्हान आहे. अशाच प्रतिकूल परिस्थितीत धनगरवाडा (धामणे-बैलूर) येथील सरकारी …

Read More »

शिक्षक दिन विशेष : शाळाच घर अन् मेंडिलकरच कुटुंब; १३ वर्षांपासून ज्ञानदानाची अविरत सेवा

  अतिथी शिक्षक नामदेव अनगोळकर यांची दुर्गम भागातील शिक्षणसेवा; गावकऱ्यांचे निस्वार्थ प्रेम हाच मोठा पुरस्कार -राधिका सांबरेकर यांजकडून  मेंडिल : खानापूर तालुक्यातील दुर्गम मेंडिल गावातील सरकारी प्राथमिक शाळेत गेल्या तब्बल १३ वर्षांपासून अतिथी शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करणारे नामदेव अनगोळकर यांनी शिक्षणसेवेत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शाळेतील एका …

Read More »

शिक्षक दिन विशेष : गवाळी ज्ञानवाटेवरील ‘वटवृक्ष’!

  तीन नद्या, दोन साकव आणि ४० फुटांचा पूल पार करून २३ वर्षे ज्ञानदान; कुटुंबापासून दूर राहून शिक्षक शामराव जाधव यांची अविरत शिक्षणसेवा – राधिका सांबरेकर यांजकडून  बेळगाव : मातीच्या लहानशा गोळ्याला सुंदर आकार देणाऱ्या कुंभाराप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे शिक्षक, स्वतः प्रकाशमान राहून इतरांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे …

Read More »

नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचे प्रोत्साह फाउंडेशनतर्फे स्वागत

    बेळगाव : बेळगाव शहराचे नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचे प्रोत्साह फाउंडेशनतर्फे शाल, पुष्पहार तसेच भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी शहापूर पोलीस ठाणे परिसरात आयोजित स्वागत समारंभात फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पोलीस आयुक्त निकम यांना शुभेच्छा देत …

Read More »