Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

कच्ची दारू विक्रीप्रकरणी एकाला अटक; २० लिटर कच्ची दारू जप्त

  बेळगाव : मच्छे गावच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी कच्ची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी २० लिटर कच्ची दारू जप्त केली. परशुराम बसाप्पा नाईक (३५, रा. वाल्मिकी नगर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ४ सप्टेंबर रोजी तो …

Read More »

गांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक; १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

  बेळगाव : शहरात गांजा विक्री करणाऱ्या तिघांना सीसीबी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून १ किलो १०० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अक्षयकुमार सोमशेखर अंकलगी (२०, रा. गुरुवार पेठ, कित्तूर), आदर्श ईरय्या हिरेमठ (२५, रा. सोमवार पेठ, कित्तूर) …

Read More »

बस तिकीट दरवाढीचे संकेत; प्रवाशांवर भार पडणार नाही

    बेळगाव : केंद्र सरकारकडून गेल्या आठ महिन्यांत इंधनाच्या किमतीत वाढ करण्यात आली असतानाही राज्यातील बस तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे केएसआरटीसीसह राज्यातील चारही परिवहन निगमला हजारो कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर बस तिकीट दरवाढीचा विचार सुरू असून, प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ तास पाणी नळजोडणीला ‘ब्रेक’

  खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी कंत्राटदारांची लगबग; उत्सवानंतर पुन्हा कामाला सुरुवात बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या नऊ-दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नळजोडणीच्या कामाला तात्पुरता ‘ब्रेक’ देण्यात आला आहे. एल अँड टी कंपनीकडे नळजोडणीचे कंत्राट असून विविध भागांत नळजोडणीचे काम सुरू होते. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

संजीवनी काळजी केंद्रात जन्माष्टमीचा भक्तिमय जल्लोष

    जन्माष्टमीदिनी जन्मलेल्या गोपाळकृष्ण शानभाग यांचा शताब्दी वाढदिवस उत्साहात बेळगाव : संजीवनी फाउंडेशनच्या काळजी केंद्रात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रातील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांना विविध पारंपरिक वेशभूषेत सजविण्यात आले होते. राधा-कृष्णाची जोडी, बालकृष्ण तसेच अन्य आकर्षक वेशभूषांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. या सोहळ्याचे …

Read More »

बेळगावच्या मराठा एलआयआरसीमध्ये भक्तिमय वातावरणात जन्माष्टमी उत्सव

  बेळगाव : गोकुळाष्टमीचा उत्सव सर्वत्र भक्तिभावाने साजरा होत असताना, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (मराठा एलआयआरसी) भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साह, श्रद्धा आणि लष्करी परंपरेच्या दिमाखात साजरी करण्यात आली. ४ सप्टेंबर रोजी मिलिटरी महादेव मंदिरात विशेष पूजा, प्रार्थना आणि धार्मिक विधी पार पडले. या कार्यक्रमाला मराठा एलआयआरसीचे कमांडंट …

Read More »

कवितांच्या सरींनी रंगले कवी संमेलन

  राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने संयुक्त उपक्रम बेळगाव : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनाबरोबरच कवी व साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या …

Read More »

मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; बेळगाव ग्रामीण भाजपचे महावीर गुडाज यांचा मृत्यू

  बेळगाव : मुतगा येथील रहिवासी महावीर बाबू गुडाज (५०) यांचा शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. सांबरा रोडच्या दिशेने जात असताना एका भरधाव अनोळखी दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेनंतर महावीर गुडाज यांना सुमारे १०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आल्याचा …

Read More »

‘बेळगावच्या राजा’चे शहरात दिमाखात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

  बेळगाव : संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या बेळगाव शहरात गणेशोत्सवाचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘बेळगावचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चव्हाट गल्लीतील श्री गणेशमूर्तीचे शनिवारी शहरात दिमाखात आगमन झाले. पारंपरिक वाद्ये आणि ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. धर्मवीर …

Read More »

टिळकवाडी विभाग फुटबॉल स्पर्धेत संत मीराला दुहेरी मुकुट

    बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर प्रेझेंन्ट कॉन्व्हेंट स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय फुटबॉल स्पर्धेत मुला मुलींच्या गटात संत मीरा शाळेने विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादन केला मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने डीपी शाळेचा अटीतटीच्या लढतीत 1-0 असा पराभव केला, विजयी …

Read More »