बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हरिपाठ अभंग व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप एम. पी. मोरे उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून …
Read More »शिवठाण हायस्कूलचे लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश
शिवठाण (ता. खानापूर) : येथील श्री रवळनाथ हायस्कूलच्या खेळाडूंनी लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. सांघिक स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉलमध्ये मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कबड्डीमध्ये मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ४x१०० मीटर रिले स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम, तर ४x४०० मीटर रिले स्पर्धेत …
Read More »शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नव्हे, तर राष्ट्रशिल्पकार! – सीमाकवी रवींद्र पाटील
खानापूर (प्रतिनिधी) : शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा नसून त्यांच्या विचारांना दिशा देणारा, मूल्यांची रुजवण करणारा आणि देशाची भावी पिढी घडविणारा राष्ट्रशिल्पकार आहे, असे प्रतिपादन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. खानापूर तालुका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शिक्षक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून …
Read More »शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा… “वडगावच्या मानाच्या राजा”चे दिमाखात आगमन!
भगवे ध्वज, ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; शताब्दी वर्षानिमित्त वडगाव दुमदुमले बेळगाव : शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या वडगावच्या मानाच्या राजाचा आगमन सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. विद्येचा अधिपती श्री गणरायाचा जन्म कसा झाला, हे दर्शविणारी संकल्पना यंदाच्या बाप्पाच्या मूर्तीत …
Read More »तेरेगाळी क्रॉसजवळ बस रस्त्याबाहेर; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्टेअरिंगचा जॉईंट तुटल्याचा आरोप खानापूर : खानापूर तालुक्यातील जामगाव–खानापूर बस रविवारी दि. ६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास तेरेगाळी क्रॉस ते शिरोली नाका दरम्यान रस्त्याच्या उतारावरून जात असताना रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे बस रस्त्याबाहेर गेल्याची घटना घडली. मात्र, बसचा वेग कमी असल्याने आणि चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी …
Read More »उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गाजवले वक्तृत्वाचे व्यासपीठ
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित उत्स्फूर्त भाषण स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकौशल्य, वैचारिक चिकित्सकता, सामाजिक भान तसेच संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे हा स्पर्धेचा उद्देश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुवर्य वि. गो. साठे …
Read More »बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याला उत्साहात प्रारंभ
पाककला स्पर्धेत दीपा घसारी आणि अनिशा मांगले विजेत्या बेळगाव : श्रीमाता सोसायटीचे चेअरमन मनोहर देसाई यांच्या संकल्पनेतून गेल्या २८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या दिवशी महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत गोड पदार्थ विभागात दीपा घसारी, तर तिखट पदार्थ विभागात अनिशा मांगले …
Read More »सरकारी शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा : रणजीत पाटील
खानापूर : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, तालुक्यातील अनेक सरकारी शाळांच्या इमारती जीर्ण व शिथिल झाल्या असून पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करून …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका रोहिणी सावंत यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इयत्ता तिसरी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका मुक्ता आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्ञानाचे भांडार’ही कविता सादर केली. विद्यार्थी अनय जोतिबा खन्नूकर या विद्यार्थ्याने शिक्षक दिनाबद्दल आपले …
Read More »‘बळ्ळारी चलो’ पदयात्रेत डॉ. सोनाली सरनोबत यांचा उत्स्फूर्त सहभाग
बळ्ळारी : कर्नाटक भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बळ्ळारी चलो’ पदयात्रेत भाजप महिला मोर्चाच्या कर्नाटक राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी रविवारी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आजचा आंदोलनाचा कार्यक्रम विशेषतः भाजप महिला मोर्चासाठी आयोजित करण्यात आला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्या. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta