Friday , November 6 2026
Breaking News

Belgaum Varta

टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आंदोलन करून आरोपीच्या अटकेची मागणी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दौलतनगर परिसरात जमिनीच्या ले-आऊट आणि मोजमापाच्या वादातून निपाणी टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील (वय ४८) यांच्यावर रिअल इस्टेट व्यावसायिक साहिल दिलीप शहा यांनी जीवघेणा हल्ला केला. या वादात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जोरात आदळल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील …

Read More »

काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर खानापूर समितीकडून पत्रक वाटप; कडकडीत हरताळचे आवाहन

  खानापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत खानापूर शहरातील शिवस्मारक परिसर, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, भाजी मार्केट आदी ठिकाणी पत्रकांचे वाटप करून १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले. कर्नाटक …

Read More »

काळा दिनाच्या निषेध फेरीसाठी बेळगाव तालुका समिती सज्ज; निवडणुकांच्या तयारीलाही वेग

अंतर्गत मतभेद दूर करून संघटन मजबूत करण्यावर भर बेळगाव : १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासह आगामी तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. मराठा मंदिर येथे माजी आमदार मनोहर किणेकर …

Read More »

जमीन वादातून टाऊन प्लॅनिंग निकू पाटील यांच्यावर हल्ला

  रिअल इस्टेट व्यावसायिकाशी वाद; डोक्याला गंभीर दुखापत, कोल्हापुरात उपचार निपाणी (वार्ता) : निपाणी शहराजवळ असलेल्या दौलतमळा परिसरात जमिनीच्या हद्दीवरून सुरु झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन झालेल्या हल्ल्यात निपाणी येथील टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित ऊर्फ निकू पाटील (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार …

Read More »

हिंडाल्को ब्रीज हायवेवर चालकाला मारहाण करून लूट; तीन आरोपी अटकेत

  ४१ हजारांचा मोबाईल, मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन पोलिसांकडून जप्त बेळगाव : हिंडाल्को ब्रीज हायवेवर बोलेरो वाहन अडवून चालकाला मारहाण करत रोख रक्कम आणि मोबाईल फोन लुटल्याप्रकरणी बेळगाव शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ही घटना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे दोनच्या सुमारास घडली होती. बेळगाव शहर पोलीस …

Read More »

बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी सुरू; प्रभागरचना आणि आरक्षण अधिसूचना जाहीर

  जिल्हा प्रशासनाकडून राजपत्र प्रसिद्ध; इच्छुक उमेदवारांचे लक्ष निवडणूक प्रक्रियेकडे बेळगाव : तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या प्रादेशिक निवडणूक क्षेत्रांची फेररचना आणि वर्गवार आरक्षणाची अधिसूचना जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष निवडणूक प्रक्रियेकडे लागले आहे. तालुका …

Read More »

जनगणनेमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार?

  जनगणना संचालनालयाचे शिक्षण विभागाला पत्र बेळगाव : कर्नाटकातील दहावी आणि बारावीच्या आगामी वार्षिक परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या जनगणना कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असल्याने परीक्षांचे नियोजन बदलावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष आता शिक्षण विभागाच्या …

Read More »

बेळगावात उद्या संघाचे विजयादशमी पथसंचलन

  सरदार हायस्कूल मैदानावरून संचलनाला प्रारंभ; लिंगराज कॉलेज मैदानावर मुख्य कार्यक्रम बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेळगाव नगर शाखेतर्फे रविवारी (दि. २५) विजयादशमी उत्सव आणि पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता सरदार हायस्कूल मैदानावरून पथसंचलनाला प्रारंभ होणार असून, सायंकाळी ५.३० वाजता लिंगराज कॉलेज मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. सरदार …

Read More »

ऐतिहासिक दसरा सोहळ्याच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांचा सत्कार

बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक दसरा सोहळ्याचे यंदा शिस्तबद्ध नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल महानगरपालिकेच्या उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांचा मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र-दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. बेळगावचा ऐतिहासिक दसरा सोहळा यंदा शांततेत, भक्तिमय वातावरणात आणि कोणतीही अनुचित घटना न …

Read More »

अतिक्रमण हटविताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला; तिघे ताब्यात

  बेळगाव : बेळगाव शहरातील शाहापूर येथील नाथ पै चौकात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना महापालिकेचे अभियंते आणि अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. शहरातील नाथ पै चौक परिसरात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी …

Read More »