Sunday , October 25 2026
Breaking News

हिंडाल्को ब्रीज हायवेवर चालकाला मारहाण करून लूट; तीन आरोपी अटकेत

Spread the love

 

४१ हजारांचा मोबाईल, मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन पोलिसांकडून जप्त

बेळगाव : हिंडाल्को ब्रीज हायवेवर बोलेरो वाहन अडवून चालकाला मारहाण करत रोख रक्कम आणि मोबाईल फोन लुटल्याप्रकरणी बेळगाव शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ही घटना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे दोनच्या सुमारास घडली होती.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलीस उपायुक्त (गुन्हे व संशोधन) आणि मार्केट उपविभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रकाश मनेश्वर कटाबळी (वय १८), अमित चंद्रगौडा पाटील (वय २०) आणि ओम गणेश ऊर्फ उमेश पुजारी (वय २३) अशी आहेत. हे तिघेही बेळगाव परिसरातील रहिवासी आहेत. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ४१ हजार रुपये किमतीचा विवो व्ही-७० एफई मोबाईल फोन, गुन्ह्यासाठी वापरलेली केए-२२ ईजे-९३२३ क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल आणि आरोपींचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

या प्रकरणाच्या तपासात पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डकर, पीएसआय आनंद आडगोंड, श्रीशैल हुलगरे, उदय पाटील, जे. आय. देवडी यांच्यासह पोलीस अंमलदार बी. एफ. बस्तवाड, अरुण कांबळे, एम. जी. कुरेर, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, जगन्नाथ भोसले, बी. एम. कल्लाप्पनवर, सी. जे. चिन्नप्पगोळ, महेश ओडेयर आणि मल्लिकार्जुन गाडवी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या पथकाच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऐतिहासिक दसरा सोहळ्याच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांचा सत्कार

Spread the love बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक दसरा सोहळ्याचे यंदा शिस्तबद्ध नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *