


सरदार हायस्कूल मैदानावरून संचलनाला प्रारंभ; लिंगराज कॉलेज मैदानावर मुख्य कार्यक्रम
बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेळगाव नगर शाखेतर्फे रविवारी (दि. २५) विजयादशमी उत्सव आणि पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता सरदार हायस्कूल मैदानावरून पथसंचलनाला प्रारंभ होणार असून, सायंकाळी ५.३० वाजता लिंगराज कॉलेज मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार आहे.
सरदार हायस्कूल मैदानावरून सुरू होणारे पथसंचलन कॉलेज रोड, गणपती मंदिर, कित्तूर राणी चन्नम्मा चौक, काकती वेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, शनी मंदिर रस्ता, शेरी गल्ली, टिळक चौक, रामलिंग खिंड गल्ली आणि धर्मवीर संभाजी चौक मार्गे पुन्हा कॉलेज रोडवरून लिंगराज कॉलेज मैदानावर पोहोचणार आहे.
लिंगराज कॉलेज मैदानावर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला कर्नाटक केंद्रीय विद्यापीठ, गुलबर्गा येथील माजी प्रभारी कुलगुरू आणि धारवाड येथील विद्यावर्धक संस्थेचे अध्यक्ष प्रा. मल्लिकार्जुन अलगवाडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्नाटक उत्तर प्रांताचे सह-बौद्धिक प्रमुख रामचंद्र एडके मनोगत व्यक्त करणार आहेत.
ही माहिती बाळण्णा कग्गनगी यांनी दिली.

Belgaum Varta Belgaum Varta