Sunday , October 25 2026
Breaking News

जमीन वादातून टाऊन प्लॅनिंग निकू पाटील यांच्यावर हल्ला

Spread the love

 

रिअल इस्टेट व्यावसायिकाशी वाद; डोक्याला गंभीर दुखापत, कोल्हापुरात उपचार

निपाणी (वार्ता) : निपाणी शहराजवळ असलेल्या दौलतमळा परिसरात जमिनीच्या हद्दीवरून सुरु झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन झालेल्या हल्ल्यात निपाणी येथील टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित ऊर्फ निकू पाटील (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी (ता.२४) सायंकाळी ही घटना घडली. रिअल इस्टेट व्यावसायिक साहिल दिलीप शाह यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पाटील यांनी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीनुसार, साहिल शाह हे दौलतनगर परिसरातील सर्व्हे क्रमांक १५६ आणि १५९ मधील जमिनीवर प्लॉटिंग व ले-आउटचे काम करत होते. शनिवारी सायंकाळी ते आनंद सोलापूरकर यांच्यासमवेत घटनास्थळी गेले. होते. जमिनीचे मोजमाप सुरू असताना भूखंडातून सोडण्यात आलेल्या सार्वजनिक रस्त्याच्या मुद्द्यावरून शाह आणि पाटील यांच्यात मतभेद झाले. रस्त्याला विरोध केल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर मारहाण करण्यात आली. पाटील हे जवळच असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जोरात आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच पाटील यांचे मित्र नितीन उपाळे आणि महादेव मल्लाडे यांनी त्यांना तातडीने निपाणीतील सरकारी महात्म गांधी रुग्णालयात दाखल केले. प्राथमि उपचार केल्यानंतर डोक्याला गंभीर दुखाप झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आहे.
चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राज् कदम, सुजय पाटील यांच्याससह समर्थकांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कुरली सिद्धेश्वर विद्यालयात स्नेह मेळाव्यानिमित्त रविवारी व्याख्यानाचे आयोजन

Spread the love  निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुरली येथील विद्यालयातील सिद्धेश्वर सन १९५३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *