बेळगाव : शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांतील तीन प्रेरणादायी शिक्षकांचा सत्कार करून त्यांना प्रतिष्ठेचे “टीचर ऑफ द इयर” पुरस्कार प्रदान करण्यात आले. 🏆 श्रीमती वजीदा भानू – उर्दू माध्यम 🏆 श्री. तुषार कांबळे – मराठी माध्यम 🏆 …
Read More »‘गांधीनगरचा महाराजा’चा अमृत महोत्सवी आगमन सोहळा आज
डॉल्बीला फाटा; ढोल-ताशांचा गजर, लेझीमसह पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन बेळगाव : शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवाची धूम सुरू झाली असून, विद्येचा अधिपती श्री गणरायाच्या आगमनासाठी शहर सज्ज झाले आहे. यंदा ‘गांधीनगरचा महाराजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुने गांधीनगर, छत्रपती शिवाजी चौक, मारुती रोड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अमृत महोत्सवी वर्ष …
Read More »आनंदी जीवनासाठी आरोग्य आणि सकारात्मकता महत्त्वाची : अनंत लाड
संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर, सोमवारपेठ, टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनंत लाड उपस्थित होते. …
Read More »शतकाची परंपरा… भक्तीचा उत्सव; “वडगावच्या मानाच्या राजा”चे आज आगमन
कारभार गल्लीतील गणेशोत्सव मंडळाचा शतकोत्सव; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक, महिलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग (पत्रकार : राधिका सांबरेकर यांजकडून) बेळगाव : ‘हृदयामध्ये स्थान तुझे, ओठांवरती नाम आहे; केल्यास मनोभावे सेवा तुझी, चरणाशी चारधाम आहे…’ या भक्तिभावनेने शतकाची परंपरा लाभलेल्या वडगावच्या मानाच्या राजाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव …
Read More »कपिलेश्वर तलावात विसर्जनासाठी पाणीच नाही; महापालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप
बेळगाव : गोकुळाष्टमीच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाची मूर्ती विसर्जन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी प्रचलित आहे. या परंपरेनुसार भक्तगण रात्री बारा वाजता पूजा करून दुसऱ्या दिवशी मूर्ती नदी, तलाव किंवा कुंडामध्ये विसर्जित करतात. बेळगाव शहरात नदी नसल्यामुळे दरवर्षी कपिलेश्वर तलावामध्ये गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. दरवर्षी या ठिकाणी विसर्जनासाठी पुरेसे …
Read More »वडगावातील खड्डे जैसे थे; ‘डेव्हलपमेंट किंग’च्या दक्षिण मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था!
गणेशोत्सव तोंडावर तरी प्रशासनाला जाग नाही; स्मार्ट सिटीच्या घोषणा कागदावरच, स्थानिक लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही वडगाव परिसरातील रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ‘स्मार्ट सिटीच्या घोषणा आणि विकासाच्या गप्पा नेमक्या कुठे गेल्या?’ …
Read More »इस्कॉन चळवळीला गालबोट लागू न देण्याची जबाबदारी तरुण पिढीवर : भक्ती रसामृत स्वामी
बेळगाव : “श्रील प्रभुपादांनी कठोर तपस्या करून सुरू केलेले इस्कॉनचे आंदोलन आज जगभर पोहोचले आहे. पूर्वी भक्तांची संख्या कमी होती आणि ते प्रामुख्याने मंदिरातच राहायचे. मात्र, आता मंदिराबाहेर राहून इस्कॉनची सेवा करणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. ही चळवळ पुढे नेण्याची आणि तिच्यावर कोणतेही गालबोट लागू न देण्याची जबाबदारी आता …
Read More »इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्या चार कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट प्रदान
बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेतर्फे आयोजित कराटे बेल्ट परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट पटकावला. शुक्रवार दि. ४ सप्टेंबर रोजी तहसीलदार गल्ली येथील श्री सोमेश्वर मंदिराच्या कार्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण ७५ कराटेपटूंनी विविध कलर बेल्टसाठी सहभाग घेतला. त्यामधून वर्धन चौगुले, …
Read More »शिक्षक शंकर सिताराम चव्हाण यांचा प्रोत्साह फाउंडेशनकडून सन्मान
बेळगाव : शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक शंकर सिताराम चव्हाण यांचा प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम खरोखरच वाखाणण्याजोगे असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी आनंदनगर, वडगाव येथे प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाजातील गुणवंत …
Read More »तातडीच्या दुरुस्ती कामासाठी उद्या शहरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित
बेळगाव : ३३ केव्ही जीआयएस श्रीनगर येथे तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या नियोजित वीजपुरवठा खंडितमध्ये श्रीनगर, अंजनेय नगर, महांतेश नगर, शिवाजीनगर, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta