Monday , September 21 2026
Breaking News

देसूर एससी स्मशानभूमीसाठी बोअरवेलचे भूमिपूजन; पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार

Spread the love

 

बेळगाव : देसूर येथील अनुसूचित जाती (एससी) स्मशानभूमीतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांतून बोअरवेलला मंजुरी मिळाली आहे. या बोअरवेलच्या कामाचा शुभारंभ आज विधिवत पूजा करून करण्यात आला.

यावेळी ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मशानभूमीत पाण्याची दीर्घकाळ भेडसावत असलेली अडचण या बोअरवेलमुळे मोठ्या प्रमाणात दूर होणार असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी या महत्त्वपूर्ण सुविधेसाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आभार मानत, स्थानिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशाच प्रकारे विकासकामे सुरू राहावीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *