Sunday , September 20 2026
Breaking News

शिधापत्रिकेतील त्रुटी दुरुस्तीसाठी विशेष मोहीम; बीपीएल लाभार्थ्यांना मोठा दिलासा

Spread the love

 

बेळगाव : पात्रता असूनही विविध कारणांमुळे बीपीएल शिधापत्रिका रद्द झालेल्या हजारो लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाने शिधापत्रिकेतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत ग्राम वन, कर्नाटक वन तसेच बेळगाव वन केंद्रांवर अर्ज स्वीकारले जाणार असून पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून 31 मार्च 2027 पर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मोहिमेत शिधापत्रिकेत नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करणे, सदस्याचे नाव कमी करणे, कुटुंब प्रमुखाचे नाव बदलणे, रास्तभाव दुकान बदलणे, मोबाईल क्रमांक लिंक करणे, छायाचित्र बदलणे, तसेच पत्नी किंवा मुलाचे नाव समाविष्ट करणे अशा विविध दुरुस्त्या करता येणार आहेत.

मुलाचे नाव समाविष्ट करण्यासाठी जन्मदाखला आणि पालकांचे आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे. पत्नीचे नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि माहेरच्या शिधापत्रिकेची प्रत सादर करावी लागणार आहे.

पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन शिधापत्रिकेतील त्रुटी तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात, असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *