Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीच्या समस्यासंदर्भात १५ पासून फोर -जेआर ह्युमन राईट्स संघटनेचे उपोषण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी फोर जेआर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटनेतर्फे बुधवारपासून (ता.१५) तहसीलदार कार्यालया समोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार आहे. हा लढा कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनेचा नाही. हा लढा निपाणी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हक्कांचा, मूलभूत गरजांचा आणि न्यायाच्या अपेक्षांचा लढा आहे. अनेक नागरिक विविध समस्यांना सामोरे जात आहेत. पाणी, नागरी सुविधा, प्रशासनाकडून अपेक्षित असलेले सहकार्य आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न केवळ कागदावर न राहता त्यावर ठोस निर्णय व्हावा, यासाठी हा आवाज उठवला जात आहे. फोर जे आर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटना नेहमीच सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी, अन्यायाविरोधात आणि समाजहितासाठी कार्यरत आहे. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यावर योग्य तो तोडगा निघावा, यासाठी प्रयत्न करणे हेच या लढयाचे उद्दिष्ट आहे. शहर आणि उपनगरातील नागरिकांनी या सामाजिक लढ्यात सहभागी होऊन उपोषणाला पाठिंबा देण्याचे अवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *