Sunday , September 20 2026
Breaking News

शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचा दोशी विद्यालयात सत्कार

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापिका व मार्गदर्शक शिक्षकांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्या हस्ते मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी मधील पात्र ठरलेल्या २ व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आठवी मध्ये पात्र ठरलेल्या २१ विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
आशिषभाई शाह म्हणाले, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळवता येते. सीमा भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जनता शिक्षण मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ असल्याचे सांगितले
शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शक एस. डी. तोडकर यांनी आपण त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत संस्थेचा नावलौकिक राज्यभर केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहावी आलेली जान्हवी वडगुले, जिल्ह्यात चौथा आलेला अर्णव -हाटवळ, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेले प्रतीक कदम, शौर्य पाटील, शिवकुमार झळके, साईराज जाधव, ज्ञानेश्वरी पोवार, गिरीजा कुंभार, अर्णव पाटील, शरयू कुंभार, प्राजक्ता कुंभार, गौरी भोसले, श्रावणी यादव, ऋषिराज कदम, प्रीतम गेंगे, आराध्या पाटील, शिराज नदाफ, आन्वीक्षीक कांबळे, पृथ्वीराज दबडे, समर्थ पाटील, प्रांजली दुरडे, काव्यांजली चौगुले, श्रेया कांबळे या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले, एस. डी. तोडकर, व्ही.आर. पाटील, आर. डी. देसाई, पी. एस. सावळवाडे, आर. आर. कपले, डी. बी. बेनाडे, आर बी. चव्हाण यांचा यावेळी सत्कार झाला.
मुख्याध्यापिका गोडबोले यांनी, स्पर्धा परीक्षेसाठी शाळेने घेतलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. तसेच पालकांनीही विद्यार्थी व शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सदानंद झळके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शिक्षक प्रतिनिधी एस. बी. यादव, एस. डी. तोडकर, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी ए. एस. शिरगुप्पे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. व्ही. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. यादव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *