Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, पत्रकार संघाच्या पुढाकारातून सीमा प्रश्नासंदर्भात राबविण्यात आलेल्या एक लाख सह्यांच्या मोहिमेतील सह्यांच्या पुस्तिका जमा करण्याबाबतही चर्चा होणार आहे. या मोहिमेच्या पुढील नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

तरी खानापूर तालुक्यातील सर्व मराठी भाषाप्रेमी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *